पान:देशी हुन्नर.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ६ ]

चित्रे काढून वर लाखेचें पाणी द्यावें. असे चित्रपट बगलेंत मारून दारोदार भिक्षा मागत फिरणारे लोक जिकडे तिकडे आढळतात. उत्तररामचरित्रांत लक्ष्मणानें रामास व सीतेस दाखविलेला चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर आहेच. कच्छभूज प्रांतांत तेथील “रावांची" स्वारी अशांं रीतीनेंं एका लांब कागदावर काढलेली विकत मिळते. परंतु तिजवर लाखेचे पाणी दिलेलें नसतें. या भूज येथील देशी चित्रकाराने काढलेला चित्रपट इतका सुरेख असतो की, तोंं मुंबईतील चित्रशाळेतील मुख्य अधिकाऱ्यांस पसंत पडून त्याची एक प्रत ५० रुपयांस खरेदी करून त्यांनी तेथील सर्वसंग्रहालयांत ठेविली आहे. कागदावर काढलेले इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे चेहेरे पुण्यांत, डाक्क्यास, दिल्लीस, बडोद्यास, व साहारणपुरास आढळतात. रजमनाम्याबद्दल वर आम्ही माहिती दिली आहे. या पुस्तकांतील कांही चित्रें छापून प्रसिद्ध झाली आहेत व त्यांच्या प्रती जयपूर येथील सर्वसंग्रहालयाचे मुख्य अधिकारी यांजकडे विकत मिळतात. पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध पुरुषांची चित्रे काढणारे लोक जयपूर येथें हल्लीं आहेत. असल्या चित्रांस एक रुपयापासून शंभर रुपये पर्यंत किंमत पडते. असलीं चित्रें मध्यहिंदुस्थानांत अल्लिपूरा येथें होतात. पंजाबांत जलंधर प्रांतांत जंग व नवाशहर या गांवी, तसेंच कांग्रा, कपुरथळा, खाटमांडु व मद्रास इलाख्यांत हम्पा, सागरा, अनंतपूर येथेही होतात. पुणे, मुंबई व इतर काही शहरांत चितारी लोक कांचेवर चित्रे काढीत असतात. कांच पुढे धरून तिजवर उलटी चित्रें काढून त्यांवर रोगणाचा हात देऊन नंतर तीं चौकटीत बसवितात. ब्रह्मदेशांत, रंगून, मोलमीन, बेसीन इत्यादि शहरांत तद्वेशीय चित्रकार आहेत. रंगून येथील इंजिनियर मेहेरबान टिली साहेब याचें असें ह्मणणें आहे की " या चित्रांत 'पर्स्पेक्टीव्ह' जरी कांहीं नसतें तरी ती फार सुंदर दिसतात. हल्लीच्या मानानें पाहिलें असतां असेंही दिसून येतें कीं ब्रह्मदेशांतील लोकांनी काढलेले चेहरे जरी कधीं कधीं मुळच्या चेहऱ्यांशी मिळते असतात तरी त्यात सबिरींत मार्दव नसतें; व चित्राच्या आसपास विलायतीसामानाच्या वेड्या वांकड्या चित्रांची रेलचेल केलेली असते. " कापडावर चित्रे काढण्याची ही चाल ब्रह्मदेशात आहे.

पोथीसारख्या हस्तलिखित ग्रंथांतील चित्रें.

 हींं कागदावर किंवा ताडपत्रावर काढलेलींं असतात, त्यांत खालींं लिहिलेलीं प्रसिद्ध आहेत. (१) जयपूर दरबारीं असलेला रजमनामा. (२) शेकशादी