पान:देशी हुन्नर.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११७ ]

त बसविलेल्या शेवाळी प्रमाणें हिरवी किवा तांबूस नक्षी दिसते. कपडवंज येथील अकीक या नावानें प्रसिद्ध असलेला दगड खेडा जिल्ह्यांतील कपडवंज गांवींच सांपडतो असें नाहीं. कपडवंजापासून पंधरा मैलांवर अमलियारा आणि मंडवा या दोन खेड्यांच्यामध्ये माजम नदींतही हा दगड सांपडतो. नदीच्या किनाऱ्यावर किंवा तिच्या तळाशीं बदामाच्या व करंजाच्या बीच्या आकाराचे व अर्ध्या रतलापासून दहा रतल वजनाचे दगड नेहमी आढळतात. ते भिल्ल लोक गोळा करून मंडवा येथील एका बोहऱ्यास विकितात. हा बोहरी दगड खंबायतेस नेऊन तीनपासून बारा रुपये मण या भावानें विकतो.या दगडांवरही झील चांगली येते, व ते कधीं कधीं पांढऱ्या व चित्रविचित्र रंगाचे असतात. मधून मधून त्यांजवर झाडें, डोंगर, नद्या इत्यादि नैसर्गिक देखावे काढले आहेत कीं काय असा भास होतो. या दगडास “खैयू " " अजीयू " आणि " राताडियू " अशी नांवें आहेत. सगळ्यांत उत्तम ज्याला दोरादार अकीक ह्मणतात तो अमदाबाद जिल्ह्यांत रामपूर गांवी मिळतो. जमिनीच्या पृष्ठ भागावर गारगोट्या प्रमाणें हे दगड सांपडतात. त्यांच्या आकाराचा कांहीं नेम नसतो. वजन मात्र अर्ध्या रतलापेक्षां जास्ती नसतें. हे गोळा करण्याची तऱ्हा वर सांगितलेल्या सबजी दगडाप्रमाणें असून त्यांजवर झीलही फार चांगली येते. झील दिल्यावर काळ्या जमिनीवर पांढरे ठिबके द्यावे त्याप्रमाणें हा दिसतो, किंवा एखाद्या फिकट रंगाच्या जमिनीवर काळसर शिरा दाखवाव्या त्याप्रमाणें दिसतो. खंबायतच्या दगडाच्या इतर जातींत 'ब्लड्स्टोन' ह्मणून एक प्रकार आहे तींत हिरव्या रंगाच्या जमिनीवर रक्त शिंपडल्या सारखे तांबडे छटे दिसतात. आणखी एक राता दगड ह्मणून असतो दुसरा एक मैमारियम नांवाचा असतो यांच्यांत पुष्कळ रंगाची मिसळ असते. कधीं कधीं स्फटिकही सांपडतात. तसेंच नीलोत्पल नांवाचे दगड आढळतात. व कधीं कधीं पिरोजाही मिळतो. यांतील कांहीं कांहीं दगड गुजराथेंत सांपडत नसून इतर ठिकाणांहून आणिलेले असतात. राजकोटापासून वीस मैलावर भाग ह्मणून एक टेंकडी आहे तिजवर असलेल्या किल्ल्यावर ह्मणजे टंकारा गांवच्या आसपास मौर्वी संस्थानांत, ब्लड्स्टोन व इतर जातीचे अकीक सांपडतात. त्यांत लीला छाटदार ह्मणजे हिरव्या दगडावर लाल छटे असा व पटोलिया ह्मणजे हिरवा, पिंवळा व तांबडा ह्या तीन रंगांनीं मिश्रित हे दोन प्रकार मुख्य आहेत. रात्या दगडावर झील चांगली देतां येत नाहीं. मैमारियम दगडाचा रंग यकृताच्या रंगाचा असतो व त्यांत शिंप्या