पान:देशी हुन्नर.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११६ ]

सूर्याच्या तापानें किंवा अग्नींत भाजल्यामुळें अगदीं फिकट तांबूस रंगाचे दगड पांढरे सफेत होतात, व तांबड्या रंगाचे दगड विशेष तांबडे होतात. पिवळट रंगाच्या दगडांत मक्याच्या दाण्यासारखा पिवळट रंग असला तर तो गुलाबी होतो. नारिंगी असला तर तो तांबडा होतो, आणि अर्धवट पिवळा असला, तर तो तांबूस जांबा होतो. ज्या दगडांत मळकड तांबूस रंग व पिवळा रंग यांची मिसळ असते तो भाजला ह्मणजे त्याजवर तांबड्या व पांढऱ्या रंगाचे स्वच्छ पट्टे उठतात. तांबड्या रंगाचा दगड पिकलेल्या रामफळाच्या फिकट रंगापासून तो रक्ता खारख्या लालभडक रंगाचाही असतो. तांबडा असून त्यांत शिरा नसल्या किंवा कोठें फाटफूट नसली ह्मणजे तो दगड उत्तम असा मानिला आहे. दगड जितका मोठा व जाड असेल तितका चांगला. पिवळा किंवा अनेक रंगाची मिसळ झालेला दगड कमी किंमतीचा असें व्यापारी लोक मानितात. साधा अकीक, शेवाळीचा रंग ज्यांत असतो असा अकीक, कपडवंज येथील अकीक, व पट्टेदार अकीक, हे चार जातीचे दगड राजपिंपळ्यांतील तांबड्या द0गडाच्या खालोखाल मानिले आहेत. सध्या अकीकाचें दोन प्रकार आहेत. एक " डोळा" अथवा " चशमदार" व दुसरा 'जामो.' याचा रंग बहुतकरून निळसर-पांढरा असतो. हे दोन्ही दगड काठेवाड प्रांताच्या ईशान्येस मोर्वी संस्थानांत टंकारा गांवापासून तीन मैलावर माहेरपूर गांवाजवळ सांपडतात. ह्या खाणीत सापडणारे दगड' जमिनीच्या पृष्टभागाजवळच असतात, ह्मणजे ते काढण्या करितां फार खोल खणावें लागत नाही. त्यांतील निखोडी दगड वजनानें पांच रतलांपेक्षा अधिक नसतो.परंतु फाटफूट असलेले हलक्या जातीचे दगड कधीं कधीं पन्नास साठ रतल पर्यंत भरतात. हे दगड मोर्वी संस्थानच्या ठाकूर साहेबांस कांहीं कर देऊन खंबायतचे व्यापारी कोळी लोकांकडून गोळा करवितात. साधा अकीक साहाणेवर घासला ह्मणजे करड्या पांडुरक्या रंगाचा दिसतो; व तो कठीण तरी, हातोड्यानें लवकर फुटण्यासारखा व आकारानें मोठा असून त्याजवर झील ही चांगल्या तऱ्हेची बसते. शेवाळी सारख्या दगडास "सबजी" ह्मणतात तो टंकारा शहरापासून तीन मैलावर बुदकोटरा गांवीं एका मैदानांत सांपडतो. सुमारे दोन फूट खोल जमीन खणली ह्मणजे या दगडाचे थरावर थर लागतात. ते वजनानें अर्ध्या रतला पासून ४० रतल पर्यंत असतात.ते साफ केले ह्मणजे त्यांजवर चांगली झील येते, व त्याजवर स्फटिकां-