पान:देशी हुन्नर.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ९७ ]

 पुण्यातील तारकशी लोक निजामशाहींतून येथें आले. येथें सुमारें आठशे तारकशी आहेत. त्यांत लाट सोनार, कोंकणी सोनार,खानदेश सोनार,अधेर सोनार, वैश्य सोनार, लाड. कुणबी,व परदेशी इतक्या जातीचे लोक काम करितात. सुमारें २५ घरें पावटेकऱ्याचें काम करितात. ७८ घरी तारकसचें काम होतें, व ८० घरीं चापडी याचें काम होतें. आणि २०० कलाबतु वळणारे आहेत. हें वळण्याचें काम बहुत करून बायकाच करितात. या कामांत कांहीं देशस्थ ब्राह्यणही आहेत. या शिवाय जुने जर खरेदी करून त्यांजपासून सोने रुपें वेगळे करण्याचें काम तीन चार घरीं होतें. या लोकांस गोटेवाले ह्मणतात. कलाबतु करण्यास एका प्रकारचे रेशीम लागतें. तें तयार करणाऱ्या लोकांस धुरेवाले ह्मणतात. असले धुरेवाले पुण्यांत सुमारे ८० आहेत. त्यांत पैठण आणि बऱ्हाणपुरचे मराठे व दिल्ली व आग्रा येथील परदेशी लोक, येथें येऊन राहिले आहेत. सदाशीव पेठेंतून भिकारदासाच्या बागेवरून हिराबागेंत जाताना एक बाग लागतो तेथे धुरेवाले लोक काम करितांना दृष्टीस पडतात.

 लाहोर, दिल्ली, आग्रा व इतर कांहीं ठिकाणीं खोटी कलाबतु होत असते.

 लोखंड, तिखें, व तांबें, या धातूंच्याही तारा तंबुऱ्याकरितां व सतारीकरितां आपल्या देशांत तयार होतात.

 वायव्य प्रांतांत रामपूर व बंगाल्यांत कुंजबिहार ह्या दोन गांवीं पक्की तार चांगली होते.


प्रकरण ६.
लांकडाचें नकसकाम.
लांकडावर खोंदीव काम.
प्राचीनकाळचें लांकडावरचें खोंदीव काम.

 "शिल्पकलेंत लागणारें लांकडांवरील खोंदीव काम " या सदराखालीं यां कामाबद्दल कांहीं माहिती पूर्वी दिलीच आहे. घरांत वापरण्यात येणाऱ्या लहान सहान जिनसांवरही खोंदीव काम होत असते. प्राचीनकाळीं आर्यलोक