पान:देवमामलेदार.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. हंसत उघड ) हं समजले, समजलें प्रेम एकमेकिवरचे. सगळे वरवर आहे, ते मला माहिती आहे. भागिरथी व धा० रा०-आपल्यावरून जग ओळखायचं म्हणजे झालं. तुकोजी-बरें तें असू दे. आतां कल्याणवरून जेजुरीला जाण्याचा बेत होता तो रहित केला आहे. येथे जवळच येवल्यास, यशवंतराव महाराज आहेत, त्यांचे दर्शन घेऊन पुढे पायवाटेने जेजुरीला जायचे. कसे काय, बेत पसंत आहेना ? भागिरथी व धा०रा०-पसंतच असायचा. साधुचं दर्शन पाप्या शिवाय कोण नको म्हणेल ? भागिरथी-हे कोण सखाराम बापु गावडे आले वाटते? धाकटी-कोण बापु का आला आहे ? केव्हा आतांच आला वाटतं, महाराजाकडून ? (सखाराम बापु गावडे येतो, व 'रामराम करून बसतो.) तुकोजी-कां बापू नाहींना वळत गाडे तुम्हाला ? आतां आम्ही स्वतांच महाराजांकडे येण्याचा बेत केला आहे. असें येवल्यावरूनच जाऊं पायवाटेनें, जेजुरिस म्हणजे झालें. आज पहाटेस दृष्टांतहि असाच झाला खंडेरायांचा.. सखाराम-मोठे नाजूक काम बुवा. मन तर अशा साधुपुरुपाचें दुखवता येत नाही. राजीखषीने होईल तेवढें पहायचे. हौशिनें काम हाती घेतले खरे, पण तें अखेर अंगास आले, माझा तेथे काय इलाज आहे बरें ! सरकारानीच सांगावें ! मी आपल्याकडून कांही कसर केली नाही. पण टाळा टाळी फारच साधते बुवा (हंसत ) आता आपल्याला तरी स्वारी वळते किं काय याची शंकाच आहे मला. तुकोजी-कां बरें ?माझातर तर्क थाहे किं,सहज वळावी म्हणन. सखाराम-सरकार, मी आपणापासून महाराजांना आणायला निघालों, तेव्हां माझा नव्हता का असाच तर्क ? पण तो कोठपर्यंत होता ? जो पर्यंत ती गंभीर आणि शांत मद्रा प्रत्यक्ष पाहिली नव्हती तो पर्यंत ! थोरपणा चेहऱ्यावर इतका स्पष्ट स्वारीच्या आहे किं