पान:देवमामलेदार.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. रायनिं असे सुचविले आहे की, माझ्या दर्शनास जेजुरीस येण्याचे अगोदर यशवंतराय महाराजांचे दर्शन घे. भागि०-अग बाई, तर माझ्या स्वप्नाला आणि आपल्या स्वप्नाला मेळ बसला. मी पण आजच पहाटेस स्वप्नांत पाहिले, कोणी एक साधुपुरुष आहे. आन त्याला मी आपली यशवंतराय महाराजच समजतें आहे, आणि बाई त्यांची आपण, देवाची जशी पूजा करता, तशिच करित आहो. (धाकटी राणी येते.) तुको ०-(हंसत ) ही आली, हिलाहि एकादें असें स्वप्न पडल असेल-विचारतो तिला. ( जवळ येते तिला आपल्या दुसऱ्या बाजूस बसवतो.) धाकटी राणी-काय विचारायचं मटलं मला ? भागि०-( हंसत ) स्वप्न पडलं कां ह्मणन हो ? कमी का आहे चेष्टेखोर स्वभाव मी झटलंना मला स्वप्न पडले ह्मणून. धाका-स्वप्ने पडतातच. ( तकोजीस) त्यांत चेष्टा कसली करायची? तुको०-अग, मला स्वप्न पडले, असें हिला मी अगोदर सांगि-तले, तर ही ह्मणते मला पण पडले. मग चेष्टा कोणी केली ? धाक-बाई कांही चेष्टा करायच्या नाहीत. ( हंसत ), आपलाच स्वभाव चष्टखोर आहे. त्यांना खरखरच स्वप्न पडला त्या खोट्ट कहींच सांगायच्या नाहीत. -तुकी-आतां तुह्मी दोघी झाल्यात एक. आम्ही आतां आपल गप बसतो. (धाकटीस ) अग पण, हिला असं विचार, की मला तिला स्वप्न एकच कसे पडले? धाक-( हंसत ) मग असं पडत नाही किं काय? पण खरच अस काय स्वप्न पडलं? ( भागिरथी जवळ जाऊन बसते ) बाई, तुम्हीच गडे सांगा मला. इकडं चेष्टा काही संपायच्या नाहीत. तुकोजी-(स्वगत ) धन्य आहे मी ह्या दोन्ही स्त्रियांना मा सारख्या वागवतो. आणि त्याहि संख्या बहिणी प्रमाणे एकमेकावर म करतात. (धाकटया राणीस पुन्हां पहिल्या जागेवर बसवून