पान:देवमामलेदार.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. वर चढून पहातों तों तें फळ दिसेनासे झाले. तेव्हां निराश झालों. पण इतक्यांत पहातों तो, तेथेंच झाडाच्या फांदीवर एक शांत, तेजस्वी पुरुष बसला आहे. त्यास मी नमस्कार करून नांव विचार. लें, परंतु तो शांत पुरुष कांहींच बोलला नाही. मात्र आमच्या या सरदारसाहेबाने त्याचे नांव यशवंतराय महाराज असे सांगून, त्याज पास्न फळ मागून घेण्याची मला इषारत केली. त्या प्रमाणे, मी फळ मागतांच त्या शांत पुरषांने ते मला दिले. ह्या स्वप्नाचा जों जो विचार करावा, तों तो आनंद अधिकच होतो. (भागिरथीबाई येते.) भागिरथी-आज मुद्रा फार प्रसन्न दिसते आहे ! कांहीं आनंदाचे वेत चालले आहेत मनातल्या मनांत वाटतं. मला नाही का कळवायचं इतके कसले आनंदाचे विचार चालले आहेत ते? तकोजी-( हनवटीस हात लावून ) माझ्या लाडकीला नाहीं सांगायचे, मग कोणाला सांगायचे ? भागि०-लाडकी असं आतां आपलं नसतं बोलायचं. धाकटी लाडकी असते कां मोठी बरं ? माझं अजून लाडकेपण संपलं नाहीं का? आपणच सांगावं? तुको०-मीच सांगतो. अग, माझ्या दोन्ही लाडक्याच. तू मोठी असलीस तरी मला लाडकीच. आणि ती धाकटी म्हणन कांहीं प्रेम तिच्यावर जास्त नाही. पण आजच हा सवती मत्सर कठन बुवा तुझ्या डोक्यात शिरला ? अगदी धाकट्या बहिणी प्रमाणे, तिला मानित आहेस, आणि माझ्या पेक्षा सुद्धा तुझें प्रेम तिच्यावर जास्त आहे ह्मणून विचारतो. भागि-अगं बाई, नुसतं विचारलं की, धाकटी लाडकी का मोठी, तर लागलीच त्याचा सवतीमत्सर करायचा ना? शर्थ आहे बाई. एक आपली जगाची रित सांगितली तर तको०-बरें तें जाऊ दे. आज आनंद कां झाला आहे तो सांगना? भागि०-(हसत) आपल्या गळ्यांत आलं, की मग तें जाऊंडे ना (गळ्यांत हात घालून) बरें, कसले आनंदाचे बेत चालले होते? तुको०-अग, पहाटेस आज स्वम पाहिलं, त्यांत प्रत्यक्ष खंडे