पान:देवमामलेदार.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ देवमामलेदार. निशा०-काय? महाराजयशवंतरायांचे तिर्थ हा प्याला? शाबास! चला तर, आपल्याला इथून आतां पळ काढला पाहिजे. (जातो.) कोन्हे -प्रिये चल, महाराजांचे दर्शन घेण्यास, हा असाच निघणार. हे तिर्थ घेतल्या बरोबर, पोट अगदी साफ झालें. मला आतां अगदी पहिल्या सारखे वाटते. ( तिचा हात धरून उठतो, जातात.) दुसरा प्रवेश समाप्त. HD प्रवेश ३ रा. (स्थळ-मनमाड तुकोजीरावांच्या तंबंतिल बसायची जागा. तुकोजीराव होळकर एकटेच बसले आहेत.) तुकोजी-(आपल्याशी) या स्वप्नाचा दुसरा काय अर्थ होणार? पहाटेस पडणारी स्वप्ने, बहुधा खरी होतात. काय चमत्कार ! असें स्वप्न मी आज पर्यंत कधीच पाहिले नव्हते, स्वप्नात प्रथम शिकारिला निघालों काय, तितक्यांत एक घोड्यावर बसलेला तरूण तेजःपुंज सरदार काय आला! खचित ती खंडेरायाचीच स्वारी. ती सर्वांगावर भंडार उधळलेली मर्ती दुसऱ्या कोणाची असणार? अहा, आज मला किती आनंद आणि धन्यता वाटत आहे ? बरें पुढें जी स्वप्नांत गम्मत पाहिली, ती तर फारच मौजेची. मला वाटलें, मी एका वृक्षाखाली उभा आहे आणि मी त्याचें फळ घोड्यावरूनच हाताने तोडित आहे. हे माझं कृत्य पाहून, तो घोडयावर बसलेला सरदार मला हसत म्हणतो, कशाला व्यर्थ मेहनत करतोस? तुला जर तें फळ पाहिजेच असेल, तर घोड्यावरून तुला उतरलेच पाहिजे. झाडावर चढ़न काढल्या शिवाय तें तुला मिळणे अशक्य आहे. मी सलाम करून म्हणालों,सरदारसाहेब, आपला हात पोचण्यासारखा आहे, तरि कृपा करून तेवढे फळ मला काढून द्या. नंतर तो पुन्हां हंसला. आणि झाडाजवळ गेलेसें करून, मला त्याने आपलाहि हात पोचत नाही, असे दाखवले. व लागलीच मला त्यांनी जबरीने घोड्यावरून उतरण्यास भाग पाडले. मी झाडा