पान:देवमामलेदार.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. निशा०-पूजा करीन! एक वचन खरें करिल तर (काठी फिर. वित ) हराम यांतलें. कोन्हे० ( ओरडतो.) वैश्वेदेव केल्या शिवाय एक दिवस रहायचा नाही ( डॉक्टर हंसतो.) निशा-(त्याच्या शब्दानी. वेडावून काठी फिरवतो.) कोन्हे०-(ओरडून) अभक्ष्य भक्षण करणार नाही ( डॉक्टर हंसतो.) डॉक्ट०-बरें आहे घेतों रजा मी आतां चिमणराव ! (डॉक्टर जातो.) निशा-कर. कर. कर. अभक्ष्य भक्षण कर. म्हणजे माझी मजा. अरे अभक्ता, आणि पृथ्वीवरील सर्व अभक्तांनो, आपली मनें शुद्ध करा. आणि ती साधुवयांच्या उपदेशा प्रमाणे ईश्वराकडे लावा. पहा मी निशाचर असन, तुम्हाला सुबोध करतो. इतर दुष्ट निशाचरां सारखा मी नाही. मी अपल्या निशाचरी वृत्तीने, जर इथे एकच भूकंपाचा धक्का देईन, तर या पृथ्वीच्या पोटांत तुम्हा सवास गडप व्हावे लागल. म्हणून त्या सर्व सत्ताधारी प्रभला विसरूं नका. बजाऊन सांगतों, साधूंची निंदा करू नका. कराल तर असा त्रास सोसावा लागेल. (काठी फिरवतो.) कोल्हे --(ओरडून ) यशवंतराव महाराजा, तुमची व्यर्थ निंदा केली. हा पापी चांडाळ आहे, याला क्षमा करा. पुन्हां मी आपली निंदा करणार नाही. प्रत्यक्ष महाविष्णू आहां आपण. निशा-( हंसत नाचत) लोक हो, मला दूषणे देऊ नका बरें. हा सारा या काठीचा गुण आहे. हीच लवाड त्रास देते. साधुची निंदा केली, की ही जादूची कांडी बसलीच बोकांडी. कोन्हे०प०-( प्रवेश करून तीर्थ पुढे करून ) इकडं बघायचं. हे तिर्थ आणलं आहे देवांचं महाराजां कडून. हे ध्यावें ! कोन्हे०-(पाहून ) दे दे दे लवकर. आहाहा, महाराज यशवतराव, आपण खरे साधु आहांत. कोन्हे०१०-( पाजित ) जय यशवंतराव महाराजा, गुण पडूंदे लवकर. नवस केलाच आहे तुम्हांला.