पान:देवमामलेदार.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. डॉक्टर साहेब. अहो औषधे उगिच का केली आहेत ? पण कितीही विचारी मनुष्य असो, त्याच्यावर संकट आले की तो प्रथम देवभोळा बनायचाच कांहो ? मला वाटते, संकट समय हाच ईश्वराची कल्पना मनुष्याचे अंत:करणांत प्रथम अस्तित्वांत आणण्यास कारण झाला. डॉक्ट-असें तर काही अंशी खरें. पण ईश्वराचे अस्तित्व आपण नाही असे म्हणतां किं काय? कोन्हे ०न्यांत काय संशय ? निशा-(वेडावून ) यांत काय छंशय ? ( काठी फिरवतो.) नाहींच संशय. (कोन्हेर ओरडतो लोळतो, निशाचर हंसतो.) कोन्हे०प०-आतां तसेंच केले पाहिजे. त्या शिवाय दुसरी तोड मला तर काही सुचत नाही. (जात) कोन्हे०-अग आई ग. ही कळ आपल्याच्याने आता नाही सोसवत. (स्वगत) बाहेरून मी देवाला खोटें म्हटले, पण देवाचें अस्तित्व खरेंच आहे. देवा तूंच माझें रक्षण कर. औषधाने काही व्हायचे नाही. डॉक्ट-अहो, पडतां पडतां पडेल औषधाचा गुण. निशा-हा बघितलास औषधाचा गुण कसा पडतो तो! (काठी फिरवतो. कोन्हेर लोळतो. ओरडतो. निशाचर हंसतो. ) लोक हो, सावध व्हा. असे अभक्त होऊ नका बरें! छळ सोसावा लागतो मग (काठी फिरवतो.) कोन्हे ०-अया या या. मेलो. मेलो, मेलो. सोडवरे रामा ! बायकोची शप्पथ तुला खोटें म्हणणार नाही. रोज संध्या करीन (डॉक्टर हंसतो.) निशा०-(वेडावून ) रोज संध्या करिन ? हे अत्तांचे म्हणणे आहे. ( काठी फिरवून ) घटकेंत विसरशील. कोन्हे ०-( ओरडतो.) अरे राम, विष्ण, इंकर, गणपति. कोण असाल ते या. शपथ सांगतो तुम्हांला, घरच्या देवांची रोज पूजा करीन. कोन्हेरची आई-काय रे देवा, माझ्या बाळाची असून तुला दया येत नाही?