पान:देवमामलेदार.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. कोन्हेरची आई०-(त्याचे पोट चोळित) काय एकदम याला झालं बाई, देव जाणे ! कचेरीतून आला. जेवला खाल्ला चांगला. निजला येऊन मात्र. नी एकदम कळ पोटांत. काय करावं बाई ! देवाचं काही चुकलं बिकलं तर नाही ? देवा गुण पडूंदे याला लवकर. तुझ्या नावानं एकवीस दंपत्यं सांगेन. कोन्हे पत्नि-(वीटेने त्याचे पोट शकित दुःखाने ) काय बाई एकदम झालं हैं ? कोन्हे०-अग, नको ती वीट. (तिच्या हातांतील वीट फेकतो.) निशा-( हंसत ) पुन्हां करतों मौज. ( काठी पोटावर फिरवतो.) कोन्हे०-ओय. ओय. ओय. रामा, रामा रामा, तूं खरा आहेस रे. (गडबडा लोळतो.) निशा०-(खदखदा हसतो. ) अग गई. अबे, लंडी. आतां कैसी रडते. (वेडावून ) रामा, रामा, रामा, आतां रामाची आठवण झाली. राम खोटा होता. उरावर बसला तेव्हां खरा झाला. रामा, रामा म्हण. का मारुति मारुति म्हण. माझ्या तडाख्यांत पुरा सांपडला आहेस. (डॉक्टर व चिमणराव या नावाचे गृहस्थ येतात.) चिम-(बायकांस ) तुम्ही जरा दूर व्हा. डॉक्टरसाहेब प्रकृति पाहात आहेत रावसाहेबांची. (बायका दूर होतात.) डॉक्ट०-प्रकृतीत तर काही विशेष फरक. पडल्याचे दिसून येत नाही. ( बाटली देऊन ) आता मी एक भाग पाजतोच. नंतर तासा तासांनी द्यायचा एकेक. समजलं चिमणराव ? ( पाजतो.) निशा-( काठी कोन्हेरच्या पोटावर फिरवतो.) पाजा औषधे. ( नाचतो व हंसतो.) कोन्हे--( आयाई करून ओरडून लोळतो. ) पांयां पडतो. डॉक्टर साहेब तुमच्या. औषध नका ते पाजू मला. मला औषघांनी गुण यायचा नाही. डॉक्ट०-रावसाहेब, स्वस्थ पडून रहा जरा. म्हणजे गुण पडेल. ( खुर्चीवर बसतो.) कोन्हे-(पोटावरून हात फिरवित ) आता काही बरे वाटतें