पान:देवमामलेदार.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. जिन-अहो, आम्ही खात पडतो. तुम्ही आम्हाला काढायला उभे रहा. पण चला. तुम्ही आपल्या निस्पृह वर्तनाने, आपण गतानुगतिक नाही, असे जगाला दाखवायला मग मागें कां घेतां ? कोन्हे-मागे घेतो असे नव्हे हो श्रीमंत-पण चला बुवा. तुमच्या म्हणण्या प्रमाणे होऊंचा ( येतात.) (कोन्हेर खेरिज सर्व महाराजांच्या पाया पडतात, महाराज आशिरवाद देतात. पडदा पडतो.) पहिला प्रवेश समाप्त. प्रवेश २ रा. (स्थळ-कोन्हेर यांचे घर. पलंगावर कोन्हर पोट दुखत असलेला पडला आहे बाजला जवळ माणसे आहेत असा पडदा उघडतो.) (निशाचर येतो.) निशा-वारे वा. आज किती दिवसांनी तरि मला हे काम मिळत आहे. आज मोठी मौज आहे माझी. कोणाला त्रास देऊन बेजार करायचे असेल, तर तें काम मला सांगावें. फार हौस बुवा आपल्याला असल्या कामाची. ही हौस जाणूनच आज मला हे काम श्रीविष्णने सांगितले. आमच्या भगवंताना ही खबर नारदानें दिली! आपल्या भक्ताचा उपमर्द झालेला पाहून, भगवंताना अत्यंत कोप आला. त्या कोपांत आतां सृष्टि जळून खाक होते की काय असें भासावयास लागले. मग नारदाने भगवंतांना शांत केल्यावर, माझी या कामावर योजना झाली. ( कोन्हेरकडे पहात ) अरे अभक्ता, यशवंतराय महाराज, हे प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार असून, त्यांचा उपमर्द ? आता ही काठी पुन्हा त्याच्या पोटास लावतो. म्हणजे पुन्हां ओरडेल. आम्ही निशाचर म्हणजे अदृश्यच. (काठी पोटावर फिरवतो.) कोन्हे ०-(कळ लागल्या सारखे करून ) ओय, ओय, ओय, मेलो. मेलो. मेलो. निशा-(खदखदा हसत ) आता कशी झाली ? भक्ताचा उपमर्द?