पान:देवमामलेदार.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ८३ (माधवराव येतो.) माध०-(महाराजांस ) हे आप्पा वाळवेकराकडून पत्र आले आहे, त्यांत-तो म्हणतो, महाराजांकडे असलेले माझे चार हजार रुपये, सखा०-( मध्येच ) काय लवकर द्या म्हणन? माध०-नव्हे. 'मी नवसांत पावलों' त्याला या साली एकदम वीस हजार निव्वळ नफा झाल्या वरून, महाराजांकडन, कर्ज असलेले घेणार नाही. असा त्याने नवस केला होता. (एका बाज चला हो कोन्हेर' असे म्हणत, त्यास ओढित, गणेश आप्पाजी जोशी मामलेदार, कृष्णाजी सदाशिव मुसळे फडणीस, तुकाराम राजाराम फोजदार, जीनसीवाले येतात.) गणेश.-चला हो कोन्हेर ? नुसतें दर्शन घ्यायला हरकत कोणची? कृष्णा०-नुसते बरोबर आमच्या यायला हरकत आहे का कोन्हेर? कोन्हे-नुसते यायला नाही हरकत हो. पण तुम्ही पाया पडलेत, म्हणजे आम्ही नुसतेच उभे राहणे शोभत नाही, म्हणून आम्ही बाहेर उभे राहतो. तुम्ही या दर्शन घेऊन. तुका०-राव चला आंत. तुम्ही पाया पडलेच पाहिजे महाराजांच्या, असा कांहीं जोरा नाही कोणाचा तुमच्यावर. जिन०-आणि जोरा कदाचित् कोणी करायाला लागलाच, तर फौजदार आहेतच जवळ आमचे. ( हंसतात.) कोन्हे-या कामांत उगीच आग्रह करण्यांत मला वाटतें अर्थ नाही. मतस्वातंत्र्य हे प्रत्येकाला पाहिजे, कोणी आस्तिक असतो. कोणी देव बीव कुछ नाही, असेंहि म्हणणारा असतो. गणेश०-नास्तिक आस्तिकाचा इथे काय संबंध आहे ? हे बघा कोन्हेर, आस्तिक, नास्तिक, सुधारक, बडे बडे साहेव सद्धां, महाराजांच्या चरणी नम्र होतात. इथें भेदाभेद कांहीं नाही. कान्हे-जोशी, म्हणूनच मी या सर्व लोकांना गतानुगतिक समजतो. मेंढरां सारखे हे सर्व खाडयांत पडायचे.