पान:देवमामलेदार.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ देवमामलेदार. मला नको आहे. ( हंसत ) तूंच म्हणत होतीस ना, आता इथून हालायचे नाही म्हणून. सुंद०-भाऊजी आतां जाऊं देणार आहेत कुठे म्हणा. पण आपलं त्याना असं मग आशेवर तार ठेऊ नये असं म्हटलं । विचारा इतके दिवस पाठिस लागला आहे तो ! सत्रा ठिकाणी हिंडूं नये म्हटले, तर त्याचा लागलीच असा अर्थ करायाचा. बाई बाई, कमी नाही हो कुणी ! ( हंसते. एकाबाजुनें सखारामबापू गावडे येतो.) सखा०-अहाहा, या वेळेस महाराज, हे प्रत्यक्ष शेषशायी भग वान, आणि ह्या सुंदराबाई प्रत्यक्ष लक्ष्मीच मला भासतात. चला, जवळ जायला काही हरकत नाही. इथे मज्जाव हा शब्दच नाही (जवळ जाऊन नमस्कार करून खुर्चिवर बसतो. उघड) महाराजापाशी मी तीच तीच गोष्ट काढून त्रास द्यावा असा अर्थ नाही. पण आता काही तरी टाळाटाळीची कारणे सांगून, महाराजांनी येण्यास अनुमान करूं नये. आमच्या सरकारांची महाराजांच्या चरणी किती दृढ भाक्त आहे, यास हे पत्र साक्ष आहे. यांत त्यांनी महाराजांस जलदी घेऊन यावे, आपल्या हातून ते होत नसेल तर मला येणे भाग पडेल. असे लिहिले आहे. सेवकाचा आतां अंत पाहूं नये. कधी निघायचें तें मुहुर्त पाहून ठरविण्यासच लागावें आता. उद्या अमृतसिद्धियोग, गुरुवार आहे, मुहुर्त चांगला आहे. महा०-बाप, आपल्या म्हणण्या प्रमाणे उद्या निघण्यास हरकत नव्हती. पण आमचे हरिभाऊ सोडतील तेव्हां ना ? त्यांची पाहिलीत ना कशी पत्रांवर पत्रे येत होती येवल्यास शहाण्यांकडे होतो तेव्हां ! सगळीकडे जातां, पण भावाकडे संगमनरला येववत नाही, असे त्याचे पत्र आले, तेव्हां तुमच्याकडे जाण्याचा बेत रहित केला, आणि इकडे आलो. आता इतक्या लवकर हा सोडिल, असे मुळीच वाटत नाही. आणि शिवाय खरें पुसाल, तर राजेरजवाडयांशी कसे वागावें, वगैरे त्यांच्या रीति भाती मला विशेष माहित नाहीत. तेव्हां