पान:देवमामलेदार.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. म्हणायचं भोग देवाला चुकला नाही, मुद्दाम आणायचा आपल्या हातांनी भोग, तेथं देव तरि काय करिल ? कितीक वेळा बिचायानं आमच्या करतां धावावं ? ते काही नाही. लोकांचं पाप नको काही भोगायला आपल्याला बरं का? ऐकलं ना? हो म्हणावं. म्हणजे मला खरं वाटेल. नाही तर मी सांगन दुरून दर्शन घ्या म्हणून, आणि इकडून सांगणं व्हावं, किं" येऊया बरं जवळ येऊंचा कोणाला असें तोडून बोलूं नये” म्हणजे पुन्हां आपली वाईट मी. महा-अग, तुला वाईट म्हटले कोणी ? कोणी तुला वाईट म्हणत नाही. तुझें तूंच आपल्याला वाईट म्हणून घेत आहेस.. लोकांचं पाप आपल्याला भोगायला नको म्हणतेस, ते लोक ते कोण आहेत इथें ? जगांतली ही सर्व माणसें खेळायला आली आहेत, म्हणून कितीदा बरं सांगितलं तुला ? त्यांत लोक काय मानायचे, आणि मी तूंपणा राहिला कुठे ? सुंद-पण बाई, हे पायाचे खेळ होतात, म्हणून म्हटलं हो. आपल्याला ते सोसवते, मग माझं काय बाई त्यांत जातें ? ( पाहिल्या सारखे करून) मी जवळ असले, तार मंडळी आपली खशाल येऊन बसतात इथं. त्यांना काही वाटत सुद्धा नाही. इकडच्या दरबारांत मज्जाव नाहींच कोणाला. मलाहि आतां त्याचं काही वाटत नाहिसं झालं आहे सवयीनें! सखारामबापु येत आहेत वाटतं इकडे ? महा.-कोण बापू ? खुर्ची आहे ना तिथे ? संद०-आहे , त्या गादिच्या चिवर बसतील ते. पण खरंच. आज ते सारखे चार वर्षे झाली, पाठीस लागले आहेत, तर कां नाहीं जायचे मनांत येत, त्यांच्या बरोबर इंदुरास ? इतक्या लवाजम्यानिशी, त्यांना इकडं इंदूरच्या राजानं पाठवलं आहे, म्हणून म्हणते हो. महा-अग, हे राजे म्हणजे लहरी असतात. प्रसन्न व्हायला उशिर नाही. आणि खप्पा व्हायलाहि उशिर नाही. असं पारतंत्र्य