पान:देवमामलेदार.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. अंक ५ वा प्रवेश १ ला. (स्थळ-संगमनेर, सब रजिस्टरचें घर. पात्रे-महाराज पलंगावर निजले आहेत, सुंद्राबाई पाय चेपित आहेत असा पडदा उघडतो.) सुंद-आता मी कुठे जाऊं द्यायची नाही हो ! जीवाला मेला थोडा का त्रास होतो आहे ? पण त्याचे इकडे काहीच वाटत नाही. बरं कुणी सांगितलं दुसऱ्यानं, तरि एकायचं नाही. हा आला याच्या बरोबर जा, तो आला त्याच्या बरोबर जा, असे सर्वांच्या मनाजोगते करून,-(पायांला हात लावून ) मेलं लोकांचं पाप हे अझून भोगावं लागतं आहे. कित्ती दिवस झाले तरी सूज पायांची आपली जशीच्या तशी. आता कुठे दोन दिवस कांहींशी ओसरली आहे. पुन्हां लोकांची गर्दी होणारच सूरू. पण मी अगदी साफ सागायचा बेत केला आहे किं, दर्शन कोणाला घ्यायचं तर त्यानं दुरून घ्यावं. दुरून घेतलं तरि दर्शनच. मग जवळ अगदी खेटून पायर्यावर आपलं डोकं ठेवण्यांत काय अधिक आहे ? आपल्या डोक्यांतली पाप लोकांना कां ती भोगाला लावायची? महा-प्रिये, उगिच कां जिवाला त्रास करून घेतेस ? भोग हा देवादिकांना सुद्धा चकला नाही. आपला भोग समजन, सखाने तो भोगण्यास तयार राहिले पाहिजे. श्रीनृसिंह जसें ठेवील तसे राहिले पाहिजे. त्याच्या मनांत येईल तर एका घटकेत, भोग नाहीसा होईल. त्याची कृपादृष्टी मुख्य पाहिजे. मला या भोगाचें काही सुद्धा वाटत नाही. त्याची कृपा असली म्हणजे पुरे. मग असले भोग सत्राशे असले तरि चिंता नाही. सुंद०-इकडं चिंता आहे कसली नाही तरी ! सगळी त्या देवालाच चिंता ठेवावी लागते आहे इकडची ! बरं नाही चिंता म्हणावं, तर सगळ्या दुनियेची आहे. आधी लोकांचं बरं झालं, म्हणजे मग आपलं. आपलं काही झालं तार काळजी नाही.