पान:देवमामलेदार.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ अंक ४ था. लोक मुळीच त्रास देत नाहीत. होईल तितकी मदत करणारे आहेत. ही साहेबांची खात्री असावी. आस्किन-टेंची मडट तुमाला कशाला पाहिजे? टुमच्या कामामंडी ट्येंची मडत घ्या, अशा शरकार टुमाला शांगटो? महा०-साहेब,रयतेच्या मदती शिवाय सरकारी काम होऊ शकेल खरें, परंतु मला वाटते, राजा व प्रजा एकदिलाने जितकें काम करतील, तितके दोघांसहि सुखावह. अश०-टे आमाला पायजे नाय. टुमचा वय झाला, आटा टुमी खुषीने पेनशन घ्यावा. महा.-सरकारचा मी ताबेदार आहे. त्यांच्या मनात पेनशन द्यायचे असल्यास ते समर्थ आहे. परंतु असे करण्यास कृपाकरून, योग्य कारण काय ते दाखविलें तर बरे होईल. अश-योग्य कारनबी टुमाला कळवण्यात येईल. बरा टो हाउंद्या. ऑफिसरेकर्डची पहिले इन्स्फेक्शन आयसे टपाशणी झाली पाहिजे. ( सर्व जातात.) Ma ( दोन कारकून येतात. ) पहिला का०-पाहिलेत, लायसन्स टाक्सचें काम महाराजांनी इतके चांगल्या रितीने बजावले, त्याचे हे फळ ! रावसाहेबांच्या हदितील, कायतों तेरा अपिलें तक्रारिची वर गेली. ह्मणजे इतर तालुक्यांच्या मानानें कांहींच नाहीत. तरि आपलें आहेच पेनशन ध्या ह्मणून साहेबांचे मणणे. दुसरा-पेनशनात बहुधा काढणार नाहीत रावसाहेबांना. जेव्हां सर्व मामलेदारांची कमेटि भरली होती, त्यांत मुलकी व गदी कामाची व्यवस्था कशी करावी, ह्या विषयीं रावसाहेबांचे मत पसंत होऊन, त्या प्रमाणे व्यवस्था कायम झाली. अशाला पहि०-अशालान तशाला काय ? " आले देवाजीच्या मना, तथे कोणाचें चालेना" साहेबांच्या बोलण्यांत किती निश्चय होता तो पाहिलास ना? दुस--पाहिला. पण खरोखर सांगतो, तसे झाले तर फार