पान:देवमामलेदार.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ देवमामलेदार. वाईट होईल. किती दयाळु स्वभाव रावसाहेबांचा ! कोणाला लागेल असा शब्द आपण तर नाही बुवा त्या मुखांतून ऐकला ! पहि०-अरे रावसाहेबांच्या या स्वभावाची, एक तुला गम्मत सांगतो. गेल्या हपत्याच्या वेळेस नोटिसा काढायच्या होत्या, तें काम कांहीं मजकडे आले; एक नोटिस मी फार जरबेची लिहिली होती. रावसाहेबांचे तुला माहितच आहे, आळस कसा तो स्या पुरुषाला ठाऊकच नाही. नाही तर पुष्कळ मामलेदार असतात, वाचल्या सवरल्या शिवाय कागदावर ठोक सही, हा त्यांचा धंदा. महाराजांनी ती नोटिस वाचली. त्यांना रुचली तर नाहीच. बरं, आतो मलाहि वाईट वाटतां उपयोगी नाही, म्हणून केली काय मजा त्यांनी, बाळ म्हण शाई उपडी केली त्या कागदावर. आणि दुसरी मग मनासारखी नोटिस लिहिली स्वतां. दुस-अरे तें कशाला ? कारकुनाला कधीही धमकावून सांगितलें नाहीं, टाईमशिर या तुम्ही म्हणून ? नाहींच कदाचित् कोणी वक्तशिर आला, तर त्यांचे काम आपण करून घेत. मग तो दुसया दिवशी करतो कशाला उशीर ? पहि•-पद्धतच कामाची वळणशिर. बरें चला. बोलत काय आपण उभे राहिलो ! त्या बारनिशा व्हायच्या पडल्या आहेत ना? चला. ( जातात.) प्रवेश तिसरा समाप्त. प्रवेश ४ था. (स्थळ-शहादे-कचेरी. महाराज एकटेच येतात.) महा-(स्वगत ) शेवटी कमिशनर साहेबांनी आपलें तें खरें केलें. किती दिवस त्यांच्या मनांत हे पेनशनचे प्रकर्ण घोळतच होतें. पेनशन दिले त्या बद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही. पण सरकारी कामाला, वय होऊन गेलें, अतएव नालायक, आसा जो शेरा आहे, त्या बद्दल माझी तक्रार आहे. सरकारी काम आज तागायत कसे केले, तें दिनदुनियेला माहित आहे. आणि या