पान:देवमामलेदार.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. प्रवेश ३ रा. (स्थळ-शाहादें-अशबर्नर, अकिन, शिरस्तेदार वगैरे.) अशबर्नर-शिरस्टेडार, ( महाराजांची यात्रा पाहुन ) ये क्या डंगल है ? इटके लोक जमून काय हेट हाय येच्या ? काय मांगना हाय येचा ? मलां वाटतो, ह्ये टालुक्याटले समडे लोक ये मामलेटडाराला टरास डेयाला एकट जमले हायट शिरस्तेदार-ही रावसाहेबांची यात्रा आहे. त्यांना आमचे लोक देव मानतात. आरिकन-कुछ मंगटा नयी ये लोक. मामलटडारची जटा हाय. मामलटडार ये कामा मंडी पडले, टे मुळे सरकारी कामाला नालायक होट चालले हायेट. क्या शिरस्टेडार ? शिर०-हें नजरेने पाहतच आहेत आतां साहेब. अशवर्नर-जट्रा हाय, टो अझून कशी मामलटडारक छोडते नहीं शिर०-एक शिपाई पाठवावा तिकडे, मणजे तो तशी व्यवस्था कारिल. अश०-( पाहत ) कुछ कारन नहीं. ये डेखो मामलटडार अलग झाला. ( अस्किनास) देखो, कैसा इनका चेहरा शांट मालुम पडता है. आस्किन-शांट हाय, लेकिन सरकारी कामका नहीं हाय. अश०-टे टो सच्या होगा. लेकिन ये आपने लोगमे होटा टो दुसरा जेसस खाईस्ट है. ये शांट और गंभीर मडासे, जेससची कल्पना बराबर आती. आश्किन-नेटिव हाय ये. अश-कुछ फिकीर नाय. टोपी निकालो. ( महाराज येतात त्यांस सलाम करतात.) अश०-क्यं मामलटडार, इतनी जटा कायकु रख टे टम ? महाराज-साहेब, लोक आपल्या खुषीने माझ्या मागे येतात. येऊ नका असे माझ्याने त्यांना म्हणवत नाही. सरकारी कामांत है