पान:देवमामलेदार.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. कावड०-ज्याच्या चरणाचा रज, आपल्या मस्तकास लागावा, म्हणून प्रत्येक मनुष्य, मग तो नास्तिक असो वा आस्तिक असो, मनापासून इच्छा करित आहे, त्या मानवस्वरुपी श्रीदत्ताच्या अवतारावर माझी पूर्ण भावना आहे. महा-मला वाटते, या पेक्षा आपण श्रीदत्तात्रयावर अभिषेक कराल तर जास्त श्रेयस्कर होईल. मानवांपेक्षा देव स्तुतीला अधिक पात्र आहेत. आपण जी माझी स्तुती केलीत ती नृसिंहचरणींच असो. कावड-महाराज कृपानिधे, मला स्वांत प्रत्यक्ष श्रीरामेश्वराने सांगितले आहे की, मी यशवंतराय या नांवानें, भूतलावर अवतार धारण केला आहे तरि ही तुझी वारावी कावड त्या महापु. रुषावर नेऊन घाल, म्हणजे ती मला पावेल. (“ऐकलेत का दुर्वासभट्ट" म्हणन द्वैपायनभट्ट म्हणतात. सर्व भिक्षुक 'ऐकलेत ' असें खुणावतात.) महा.- (हसत) स्वमावर सुज्ञ पुरुष बेताताच भरंवसा ठेव'तात. मनांत जे घोळत असते, तेंच बहुत करून स्वप्नांत दृष्टिस पडतें. कावड०-दयानिधे, का सेवकाचा अंत पाहतां ? काशीहून कावड घेऊन निघालों, तो अर्ध्यावाटेंत, सातपुडयाजवळ शितज्वराने गाठले. आणि आतां माझी पाप्याची बारावी कावड रामेश्वराच्या मनांतून घ्यायची नाही असे वाटले. आणि देवाच्या निर्दयत्वा बद्दल त्याला दोष दिला. परंतु रात्रीच पहातों, तों स्वमांत गौरवर्ण, भस्मचर्चन केलेला, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, हातांत पळी पंचपात्री, त्यानेच मला सांगितले की, यशवंतराय महादेव मचि आहे. ( आंत शिंग व बाजत्रों वाजतात.) आचार्य-हे वाजंत्री आले. चला करा आरंभ-ॐकेशवायनमः(नंतर महाराजांवर विधीयुक्त रुद्र म्हणून अभिषेक होतो.) प्रवेश दुसरा समाप्त.