पान:देवमामलेदार.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ देवमामलेदार. कोकिळा-मोठमोठया बायका निघाल्या आहेत यायला. त्या येताहेत घेऊन. मंजुळा-(कोकिळे जवळ जाऊन ) कोकिळे, आज इथं । काय होणार आहे माहिती आहे तुला ? कोकिळा-हो. मला सांगितलाय माझ्या आईनं. काशीहून गंगेच्या कावडी रामेश्वराला घालणारा एक ब्राह्मण आला आहे. तो आज महाराजांवर, त्यांने आणलेल्या कावडीनं आभिषेक करणार आहे हो. मंजू०-या पाहिल्यास बायका हातांत फळांच्या आणि मिठाइच्या पर्या घेऊन इकडे येत आहेत. जसं काही लग्नाचं रुखवतच. कोकि०-ती पाहिलीस, मंजळे तुझी आई. ही नथ कधी केलीग तुझ्या आईला? मंजुळा-ती मी घालून बघीतली होती कोकिळे. पर्वाच केली नथ शेटिनं. ती बघीतलीस तुझी आई! सगळ्यांच्या मागे आहे. (स्त्रिया प्रवेश करून समया भडजी जवळ देतात, व वाजला उभ्या राहतात.) आचार्य-दुर्वासभट्ट अजून ते आभिषेकपात्र नाही ना टांगलें ? ते पहा महाराज, आणि ते कावड खांद्यावरून घेऊन आपले यजमान आले सुद्धा. (गडबडिनें दुर्वासमट अभिषेकपात्र टांगतो. महाराज व कावडवाला येतात.) आचार्य-(पुढे होऊन महाराजांस हाताने धरून ) या आसनावर स्थित व्हावें. ( महाराजांस बसवतो. कावडवाल्यास) आपण इथं असे बसा. ( बसवतो.) ( महाराजांच्या स्त्री पुरुष पाया पडतात. महाराज अशिरवाद देतात.) कावड-महाराजांनी माझा एवढा मनोरथ पूर्ण केला, म्हणजे मी कृतार्थ झालो. महा.-भदेवा, आपली काय भावना असेल ती खरी, पण मी यःकश्चित्त मनुष्य आहे.