पान:देवमामलेदार.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. प्रवेश २ रा. (भिक्षुक येतात.) द्वैपायनभट्ट-अहो दुर्वासभट्ट, त्या अक्षता कुंकुममंडित केल्यात नीट ? हं घ्या हे (दर्भ देतो) पवित्र करा बरें एवढी! बाळ नारुभट, पांट मांडलेस? हा गुलाल घे. आणि तेवढया भागाला चौकोनी पट्टा ओढ. दुर्वा०-नाऱ्या कपाळाला भस्म नाहीं तुझ्या ! किती वेळ सागितलें तुला? ( चापट मारून) आणि शेंडीला गांठ दिली असतीस तर आई मेली असती वाटते तुझी ? जमदग्नि-(चापट मारून) हा आमचा गोप्या तरि असाच. संध्या केली होतीस का घरून येतांना! गोपाळ-कांहीं तरि काढून आमच्या बार्वाना, धोपटायला पाहिजे कुठुन तरि मला नाही तर आईला. मोठ्यामोठयाने घडघडीत संध्या आईच्या देखत मटली तरी जमदग्नि-चुप. चुप. कुठे काय बोलावें तें रांडलेंकाला समजत नाहीं (धोपटतो. आंतून जमदग्निभट, अशी हाक येते.) आचार्य-( पुढे येऊन ) अहो, तें आसन, तो चौरंग मांडला कां ? आभिषेकपात्राची योजना केली? जमदग्नि-( गडबडीने चौरंग वैगरे मांडून ) तयारी आहे आचार्य. (मंजुळा व कोकिळा मुली येतात. ) कोकिळा-(मागून येत ) मंजळे, तू आपली फुलें कुणाजवळ दिलीस? मंजू०-ती फुलांची टोपली दिसत नाही का, तिच्यांत टाक हो! कोकिळा-दिसली हो. ठेवते त्यांत. ( एका भिक्षुकास ) हें गंध उगाळून आणायला सांगितलं होतं, हे कुठे ठेवायचं भडजी ? दुर्वास ०-मुली, ठेव ते इथें. समया पाहिजेत इथे. कोण येत आहे घेऊन?