पान:देवमामलेदार.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. 'महादेब-मग काय म्हणाला? सुंद-ओरडून म्हणाला, चल तयार हो. सर्व स्त्रिया-घाबरल्या असाल मग तुम्ही? सुंद-मुळीच नाही. त्या वेळेला माझी भिति बाई कुठच्या कुठेच गेली होती. मी म्हटले तयार आहे, मार एकदांची ठार मला नी सोडव. सखु-मग? सुंद-मग मेला जे म्हणाला, तें “शिव शिव ' मी तोंडानं सुद्धा उच्चारूं नये. सखु-कांहीं चहाटळपणा करायला लागला असेल मेला. सुंद-नाही. तसा तो दुरूनच बोलत होता. पण मग म्हणाला तूं माझी बायको झाली आहेस. तुझ्या पतिनं तुला, मला अर्पण केली आह; तर आता उशीर लाऊं नकोस. असं म्हटल्यावर त्यानं, मग माझं पित्त खवळलं. म्हटलं मेल्या, तुझ्या नावानं डोकं फोडून प्राण देईन. तर म्हणाला दे. आन जवळ यायला लागला, तेव्हा त्याला दटावलं, आन पतिव्रतेच्या शापानं काय होतं, त्याची आठवण दिली. तसं मग बाई, त्याचं त्यालाच काय वाटलं, माझ्या पार्यावर डोके ठेवलं, आन मातोश्री क्षमा करा, चुकलों असें म्हणाला पुष्कळ. आणि मला डोळे मिटायला सांगितलेन्. मग लागलीच डोळे उघडून पहाते तों, या आपल्या गांवच्या वेशी जवळ उभी आहे; आणि वैरागी बिरागी कोणी नाही जवळ ! सखु-मग तुला फार वाईट वाटलं असेलना त्याला वाईट बोलल्या बद्दल ? अग वहिनी तो देवच ग देव ! (पाणक्या येतो.) पाणक्या-बाईसाहेब चला, पाणी उपसले आहे. (माधवराव व काळू शिवाय सर्व जातात.) माधव-काळ, तंहि जा जवून घे. सगळा दिवस तुला आज उपास पडला जा. (काळू 'जी' म्हणून जातो.) मी आता महाराजांना ही बातमी कळवायला जातो. अन महाराज आळे का नाहीत आज ? (जातो.) पहिला प्रवेश समाप्त.