पान:देवमामलेदार.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. त्याच्या बद्दल वाईट वाटत नाहींहो. पण ह्या लोकीबायका काय म्हणत असतील हो आपल्या मनात ? सगळ्यास्त्रिया-तुम्ही अगदी खंती होऊं नका बरं ! तुम्ही काय केलेत् यांत तर तुम्हाला लोक वाईट ह्मणतील! एक स्त्री-( सुंदाबाईचे डोळे पुशित. ) पुसा डोळे. उगिच वाईट घाटन काय बरं घ्यावं? चला घरांत आधी, त्या सासु सासन्याच्या दृष्टिस पडा. त्यांचे जीव कसे टांगणीला लागले असतील बरें ? (तिला घरांत नेतात हरिबाई, माधवराव काळ आहेत असें दिसते.) आतां पहा कसं, आनंदानं घर गजबजायला लागले. हरिबाई-( पाहून ) बाळे सुनवाई आलीस कां ? माघी मला भेट माझे बये ( भेटतात.) महादेव-त्या ईश्वराला करुणा आली आमची. विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता तोच आहे. भक्तांचे सत्व पहातो तो. (सुंद्रेस ) बाळे, काही वाईट वाटून देऊं नको वरें! माध०-आईसाहेब, बाईसाहेब, आतां गहिंवर आवरावा हे चांगलें! हरिबाई-माधवराव, आम्हाला गहिवर आवरायला सांगतां,आणि तुमचा कंठ कशाने इतका दाटून आला हो ? तुम्ही सुद्धा आता काळू-चिभन रडण्या मंदि या लई गोडि लागती आतां । सलू-( सुंदरावाईचे डोळे पुशित.) वहिनी, आतां रडण्याचं सर्वांनी पुरे करा. त्या वैरागडयाच्या हातून कशी सुटलीस ते सांग बघू.! सुंदा-अहो, त्याच्या स्वाधिन मला केलं, आन् मी जिवाची आशाच सोडली. तो नेईल तिकडं त्याच्या मागोमाग गेले. पुष्कळ दर दूर नेलन्, मागे पाहू नकोस म्हणाला, मी काही पाहिलं नाही मागं. मला सांगणं झालं होतं, जसं हा बैरागी सांगेल तसं वागायचं. पुष्कळ पुष्कळ लांब स्या नदीच्या पलिकडे नेल्यावर, मला एकदम महणाला चल सखु- मग? हरीसुंद-मी म्हटलं चाललेच आहे.