पान:देवमामलेदार.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. हकड घोरांत पडल्याती. आन ह्येच्या चालल्याति चवकशा. (हकक्यास्वराने ) आपल्यास्नी कायबी युगत सुचत नाय अशा परसंगात. त्यो अव आमच्यावर काय कर्पा करिल ती खरी. (एक गृहस्थ येतो.) गृहस्थ-(माधवरावास.) कोण ? माथवराव? आनंदाची खबर आणली आहे तुम्हांला. बाई साहेब वैराग्याच्या हातून सुटूनमाधवकाळ- माल्या म्हणता? गृहस्थ-होय आल्या. काळू-हत गावात? गृह-गावात आल्या बाबा, गावांत आल्या. (माधवरावास) ह्या मनुष्यास हर्षवाय होईल. संभाळा-नागरिक स्त्रियांचें ज्यांच्या भोंवतीं वलय आहे, अशा तुमच्या बाईसाहेब लवकरच तुमच्या दृष्टीस पडतील. (जातो.) माधव-चला काळ, ही बातमी आपण घरांत कळवं. ( सख येते ) ताईसाहेब, आनंदाची वार्ता, आमच्या बाईसाहेव आणि तुमच्या वहिनी आल्या. सलू- हर्षाने ) खरं किं काय ? काळू-खरं किं काय मंजे ? खोटं न्हायच व्हायचं. आमी ही खबर बाबासावास्नी आन आईसावास्नी घेतो. तुमी व्हा होवं तर मोर बाईसाबास्नि भेटाया. सखू-ही मी जातेच. ( सुंदराबाई व काही स्त्रिया येतात. एकदम सुंदराबाईकडे धावत जाऊन ) अग वहिनीअ-मला एकदा कडकडून भेट अगोदर ! ( भेटतात.) पहिली-पहा, ह्या दोघींची विचाऱ्यांची कशी भेट होताक्षणी दशा झाली ती. गहिवराने कंठ दाटल्यामुळं, एकमेकीकडे चित्रासारख्या पहात आहेत. तोंडातून शब्द काही निघत नाही. सख-(स्फंदत) बहिनी, त्या मेल्या बैरागड्याच्या हातून कशी सुटलीस तूं? सुंदरा-(स्फुदत ) वन्सं, काय हे माझे धिंडवडे ! मला काही