पान:देवमामलेदार.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. काळू-बाईसाहेबांशिवाय ह्य त्वांड तुमास्नि दावावं कस, असंबी यकदा मनात आल व्हतं, आन ह्या जीव अक्शी कटाळला, तवा बगा, वाटतल्या नदिमंदिच ध्येनार व्हता इश्रांती. पन कशामुळं ते समजत नाय मना, पन बाईसाब परत येनारच, अस बगा हे मन अक्शी सांगायास्नी लागलं. महाराजांच्या पार्याच्या पुन्याइन -माधव-अरे पण तू त्यांच्या मागोमाग गेलास तर झाले काय काय तें तर सांगाशिल? त्यांना मध्येच सोडून तर नाही आलास? काळु-माधोरावदादा, ह्यो काळु ज्येचं आन खातो त्येचं अस अर्धवटच काम करिल असा वाटत कां तुम्हास्नि ? हतुन त्यांच्या मागोमाग तुह्मां साम्नेच निघालो, त्यो बघा आठ कोस त्यांचं मागं ग्येलो. वाटमंदी नदी आली आडवी, तवा त्या बैरागड्यास्नि, आन आपल्या बाईसाहेबास्नी गुडगा गुडगा पानी. अन चिभन मी बघतुया तो पान्यास्नि अंत नाय. मंग ग्येलो हात मारित पल्याड. आन पघतां पघता दिली यकाकी गिरकांडी न काय त्या बैराग्यान ? तवा पघा भरमिटा सारखं मागंबि पाह्यलं, मोर पाह्यलं, समद्या राजला धावत सुटलो. पन त्येचा कसचा पत्ता लागतो. पुन्हा यंगालो मनांत, बाईसाब तार हत कुठं आढळत्याल. म्हून मोठ्या मोठ्यानं पिसाळल्यावानी सादाबी मारल्या. पन थत कोन ओ देतुया रानांत ? दमलो दमलोन् चिभन रडच एकदम कोसळल मास्नि. त्या मावलीचा सुमरण झालं, समद्या जलमाच्या कथा आठवल्या आन तुमास्नी सांगितला त्यो इचार केला व्हता, पन तुमास्नी सांगतो, देवाच्यान तो सादा बैरागि न्हायच. कोनी तार परमेसराचा अवतार हाय माधव-सगळे खरे, पण काळू, आज बाईसाहेब आल्या शिवाय मी अन्न घेणार नाही, असा नेम केला आहे. आणि तूं तर असें ह्मणतोस? काळू-तुमच्या मनामंदि काय मी खोटं सांगतो व्हय? माधव-खोटे नाही रे, तुझ्या विषयी माझी खात्री आहे. पण आता पुढे युक्ति काय करावी? ( पडद्यांत गलबला होतो.) काळू-इचिभन ह्ये लोक उगिच गागत्यात. आमच जीव