पान:देवमामलेदार.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. हरिबाई-एक दिवस लहानपणी, झणजे देव देव्हाऱ्यांतला नाहींसा केलान् नाही, असें व्हायचंच नाही. एक दिवस तर, नरसावाची मूर्ती देवांतली गेली खेळायला याच्या बरोबर. पहातें तों चालली आहे पूजा तिची. कांहीं विटकरा, धोंडे, दगड मोडून. लहानपणा पासून, हे त्याचं अस्सं चाललं आहे. बरं आतां पुढें कसं करायचं माधवराव ? कांहीं युक्ति काढा तुझी ! माधव-मी स्वतः जातों हवा तर, त्यांच्या शोधा करतां. मला नाही वाटत की तो बैरागी बाईसाहेबांना घेऊन जाईल असं. 'तो होऊनच पहा परत त्यांना येथे आणून पोंचविल. महादेव-पण माधवराव, असें ह्मणून स्वस्थ तर बसता येत नाहींना? भला असला तर करिल तसं सखू-कसली मेली या बैरागड्याची भलाई ! माधव-मी जातोच. ( कानोसा घेत ) बाहेर गलबला कसला आहे ? (बाहेर येऊन ) वाइसाहेबांचा शोध लागल्या शिवाय, आज अन्न घ्यायचे नाही. (काळ येतो) काळु-चिभन लोक बघा कस हायती. रिकमटेकड गवगवा करित सुटल्याति. फलान्यान् आपली बाईल विस्तान्याला दिली, पन् मी मंगतो, मारिन घरचा खाऊन, या दुसऱ्याच्या उठाठेवी पाह्यज्यत कशाला ? चिभन् उगिच इवळत्यात. गागत्यात, आन् त्या बरागड्याला शियाबी घेत सुटत्यात. समद्या गावामंदी, येच काहूर माजन राह्यलया. रस्त्यामंदि बघा जो भेटला तो, 'ह्य कसं काय झाल पुढे काय व्हनार' म्हून इचा इचारून मास्नी अशी बेजार केलया. आपन थतन् मारल त्वंडाला टाळं, त्ये आत्ता उघडतुया. चिभन येना इचाराय काय व्हतया, काई सरम पडत्यात? सकालपून पघा ह्यो तिसरापार झाला, पोटामंदी कसं कावळ कोकलत्यात. कंबर मोडलीबी त्या बैरागड्याचा पाटलाग करूनशान(माधवराव येतो.) माधव-कायरे काळ? काय झाले काय शेवटी? असा उदास कां ? बाईसाहेब