पान:देवमामलेदार.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. माझ्या अंगाचा थरकाप होइ. मेला हा राक्षस, आता दादालान् बहिनीला मारतो किं काय, असें सुद्धा एकदा मला वाटलें ! माधव-कडक; तामसी भारी. प्रथम ह्मणाला आटा दे देव, आटा दिला. चावल दे देव, चावल दिले. लकडी दे देव लकडी दिली. घी दे देव, घी दिले. डाळ दे देव, डाळ दिली. मग बोले वस्त्र देदेव, वस्त्र दिले. बासन दे देव वासन दिले. जे मागे, ते महाराज देत सुटले. आणि हा मागत सुटला. शेवटी ह्मणाला तेरि लुगाई देदेव, तेव्हां वाईसाहेवानां पुढें उम्या केल्या त्याच्या आणि विचारले महाराज, आणखी काय पाहिजे तेव्हां तो रागावला. मग त्याची समजत घालून, महाराजांनी बाईसाहेबास सांगितले किं, तुझा आणि माझा ऋणानुबंध असेल तर गांठ पडेल. मी ह्या बैरागी बावांच्या तुला स्वाधिन केले आहे. त्यांना शिवस्वरूप मानून, त्यांची मजप्रमाणे सेवा करित जा. त्यांना वाईट वाटेल असें कांहीं करूं नको बरें ! ते माझ्या पेक्षा जास्त चांगल्या रितीने तुला वागवतील. तुला वाईट वाटू देऊ नकोस. तूं माझी आजपर्यंत जी सेवा केलीस, त्याचे हे आज तुला फळ मिळत आहे असे समज. आणि गहिवर दावीत महाराज बाईसाहेबांना जा ह्मणाले. महादेव-एकंदरित असे झाले तर? तो बैरागी प्रत्यक्ष शिव तर नसेल? सखू-बाबा, शिघ कसला तो ? मेला दांडगा होता एक बैरागडा. महादेव-अग, त्याची लहानपणची वृत्ति आहेना तुला माहित ? देवावर, साधुसंतावर श्रद्धा त्याची अतोनात. आणि जे कोणी काही मागेल, ते त्याला द्यायचे हा कायतो छंद. तशाच त्याच्या लहानपणाच्या खोड्या तरि ह्या अशाच. नेहमी, आपल्या बरोबरीच्या शाळेतल्या पोरांना कागद दे, शाई दे, लेखण्या दे, आपण आपला पुन्हां खंक. पुन्हां घरीं आला किं नवी तयारी करून द्यावी लागे मला. बरें विचारले तर नाकबल जायचा नाही. शांतपणे सगिायचा कि अमक्या अमक्याला जरूर होती, मग मी दिले त्याला बाबातन्हांच मी याचे भाकित केले होते.