पान:देवमामलेदार.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. अगदी वेडगळ पोरगा होत चालला. 'आत शहाणा त्याचा बैल रिकामा' ह्मणतात तो असाच. (कहणतो. अ य य या.) हरिबाई-हे आलेच माधवराव इकडे बोलवल्या शिवाय. या माधवराव, वसा असे. बाळ आहे का घरांत ? (सखुस ) का कुठे बाहेर गेला आहे ग ? सखू-अग, कचेरित गेला.पागोटं कसं तरि घातलंन डोक्याला. आंगरख्याचे बंद सुद्धा उलटे सुलटे बांधले. अंगवस्त्र घेण्याला विसरलाच होता, तें पुन्हां घाइनं परतून आंगावर घेतलेन् नी गेला. त्याचा तरि जीव सचित कुठे आहे, पण करतो थापला काही तार. कचरित जाताना आज इकडं आलाच नाही वाटतं, तुमच्या पायांवर डोकं ठेवाचंनी जायचा तो ? महादेव-माधवराय, म्हातारपणी, आता काय काय आहे हो माझ्या दैवी पाहण्याचें ? हरिबाई-पोरगं खळावलं गे बाई माझं कोणा तार मेल्या चटक्याचं हे काम आहे, मी खास सांगते अगदी. तर मी रोज दृष्ट काढते. माझ्या वाळाची, याला दृष्ठ पडूं नये कोणाचा म मला रोज मोठी भिती वाटे की, असं काही सरि याचं कधा होईल. चांगली गोजिरवाणी मुलं, चांगल्या गणाची मोठाली माणस सुद्धा या चेटक्यांना पाहवत नाहीत. मेल्यांचे जगातून निसंतान कसं नाही होत ? ( बोटे मोडते.) माधवराव-मला सुद्धां बाईसाहेष गेल्या पासून, चैन पडत नाही आहे. काळुला मी त्या बैराग्याच्या मागोमाग रवाना केला आहे. महादेव-काळला पाठवला आहांत ? हे एक बरे केलेत. आप खुषाने ह्या पोरट्यानं त्या बैरागज्याच्या तिला स्वाधिन केलीना ? माधव-हें काय विचारता हो ? एरवी त्या तशा जात्या ? आणि तो वैरागी तरी नेता का? तो नेत नव्हताच, पण महाराज ह्मणाले, मी संतोषाने ही अर्पण केली आहे: सरि हे साधो, तुम्हा हिचा स्विकार करण्यास स्वत:स मुळीच अनुमान वाटू देऊ नका. सखू-काय मेला. तावडेलाल डोळे करी तो बैरागी ओरडे तेव्हा.