पान:देवमामलेदार.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. दुसरा-होय. ते आतां शहाद्यास जाणार आपल्या कामाचा च्यार्ज घ्यायला. पुणेकरांचा आग्रह भारी, म्हणन त्यांच्या साहेबांनी ही रजा दिली होती. बरें आहे, गुडनाईट सर. पहि०-गुडनाईट. ( जातात.) अंक तिसरा समाप्त । अंक ४ था. प्रवेश १ला. (स्थळ-शहादें, महाराजाचे घर. पात्रे-महादेवपंत, हरिबाई, सखुबाई, माधवराव, काळु वगैरे.) सखु-अग आई, बसली आहात काय तुम्ही अशी स्वस्थ ! दादानं आत्तां काय केलंन् तें कळलं नाही का तुम्हांला हरिबाई-काय झालं बाई, अशी घाबरून बोलतेस ती ? काय केलंन् दादान असं? महादेव-काय ह्मणते आहेस तं सखे सखू-काय ह्मणतेस ह्मणजे ? घराची शोभा गेली ना ग? दादानं वहिनीला तो एक मेला बैरागडा आला होता त्याच्या स्वाधिन केली ना आतां! तुझी तरि काही तजविज करा आतां, तिला परत आणण्याची. दादा काय बाई अगदीच भोळे शंकर. त्या मेल्या सोळभोकानं, त्यांना बोलण्याच्या भरिस घातलं, त्यांच्या अंगावर मेला मोठया मोठयांनी ओरडला. तरि दादा आपले शांतच. बायको सद्धां देऊन टाकली, ह्मणावे काय बाई आतां ? आई मला काही बाई वहिनी आल्या शिवाय चैन पडायचे नाही हो. कसंसंच मेलं मन अगदी, उदास, उदास, झालं आहे. देवा वहिनीला लवकर येऊदे रे बाबा घरी? महादेव-माधवरांवना आत्तां इकडे मी बोलवतो आहे ह्मणन सांग जा! मला मातान्याला पहा काय आतां यातायाती त्या