पान:देवमामलेदार.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. आमाला फारसा टरास डेट नाही. पन ये टर खात्रीचा, अनुभवाचा वचन, की आमच्या पुढच्या पिढीच्या टो मानगुटिश बशनार. पन ये महाटमाचे करटा भरवलेले जिआफट दरबारांट आमचे पुढचे पिढीला आणि आटांचेलाबी मी सांगूण ठेवटो की, टेनी या देशचे लोकांस च्यांगल्या रिटीने वागवला, टो ट्यांत आमच्या लोकांचा व आमच्या प्रिय रयटेचावी खरा हिट हाय. आशा टे न वागवटील, टर टो आमच्या सुढारनेला कलंक हाय. ये मानवजाटला भुषण, अशे माहाराज आज ये डरवारांट मुख्य स्थानी बसले हैट, आन् ट्येच्या शमक्ष मी अशा शांगटो की, आमी सुढारलेले आंग्रजांनी प्रिथिमीवरचे शर्व मानव जात एक करणेच्या प्रयत्न केला पाहिजे. आन् दुसरे जो पृथ्वी सरीके लोक, चंद्र मंगळ, ट्येच्या विचारास लागले पाहिजे. या मटिं आमाला खरा भषण हाय. (टाळ्यांच्या गजरांत बसतात.) महा०-सरकारांना मी प्रथम विदित केलेच आहे, किं या सन्मानास मी पात्र नाही. परंतु श्रीनरहरिचे प्रेरणेने, जे कांहा साहेबबहादुरांनी केले, त्या बद्दल मी सेवकानें, आभार कोणत्या रितीने प्रदशित करावे, तें या समयीं कळणे मला अवघड झाले आहे. तार रिती प्रमाणे मी सरकारांचे आभार मानतो. ( टाळ्यांच्या गजरांत बसतात.) ( अत्तर गुलाब वगैरे होते, हारमोनियम वाजतात. ), विनायक वासुदेवजी-लॉट साहेबांनी इंग्रेजी रिवाजाचे स्वागत आजच्या सभारंभा करता आलेल्या नेटिव व नेटिवेतर यांचे केलेच. आजच्या सभारंभा मुळे, सर्व नेटिवांस फार संतोष झाला आहे.. तरि ही हिंदुरिवाजाची पानसुपारी वाटण्याची मी व्यवस्था ठेवली आहे. तिचा स्विकार करून नंतर मंडळींनी रजा ध्यावी. ( पान सुपारी वाटतात. पडदा पडतो.) (दोन गृहस्थ येतात.) पहिला-काय? निघणार म्हणतोस महाराज उद्या येथून रजा संपली त्यांची?