पान:देवमामलेदार.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार, फेडून घ्यावा. आणि मला कृतार्थ करावें. आपल्या कृपाछत्राखालच्यांत या दासाला लेखिप्त जावा. (दुसरा एक गृहस्थ येऊन नारळ ठेऊन पाया पडतो.) दु० गृ०-महाराज, बढती मिळाली. तरि बोलल्याप्रमाणे नवस फेडायला आलो आहे. मान्य करून घ्यावा, आपल्या सेवक वर्गात गणना असावी या दासाची. (आंतून एक तिसरा गृहस्थ येतो.) तिगृ०-घलावं महाराज उदक सोडायला. सर्व सिद्धता झाली आहे. ब्राह्मण खोळंबले आहेत. महा०-चला, ( तिथे जमलेल्यास ) आपणहि श्रीनरहरिचा प्रसाद घेण्यास चलावें. (जातात. पडद्यांत मंत्राचा घोष व 'हर हर महादेव.') दुसरा प्रवेश समाप्त. प्रवेश ३ रा. ( स्थळ-पुणे. गणेशखिंडीतील गवर्नरचा बंगला, पात्रे-सरवुईल्यम राबर्ट, महाराज, व जाफतीस जमलेली मंडळी) (सरवुइल्यम राबर्ट, महाराजांस आपल्या हातांनी उच्चासनी बसवतात.) महा०-सरकारच्या ताबेदाराचा ताबेदार, असा मी एक यःकश्चित् मामलेदार आहे. इतक्या सन्मानास मी पात्र नाही. गव्हरनर-शेव्यशेवकभावा शंबंढानें, मी अपांश पहाट नशून, आपण शर्वः पूज्य अहाट, टेअर्थी मलाहि टे मान्यच अशल्यावरून, हे जे काही मी आपणा करटा फरिट आहे, टे काहीच नाही. ( पुष्पहार महाराजांच्या कंठात घालतात.) आपल्या औडार्यादि अमोलिक गुणांच्या, सर्वाच्या मनावर पगडा बशला; ये माझ्या मन निराळा वस्ट्रंचा बनला हाय, अशा नाय. गुण जा हाथ टो कोठहि अशो, आपला पगडा वशवणारच. आपण नेटिव लोकांना टो भुषण हायचा. पन् अवघे मानव चाटलाची मापते