पान:देवमामलेदार.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ( कडेवर बालक असलेली स्त्री, एक मातारी आणि एक पुरुष येतात.) दुस-अग उभी रहा. ही कडेवर मुलगे असलेली मला वाटते तुझ्या सारखीच नवस करून गेलेली असावी. ती आतां फेडायला आली आहे. तर तुला हे पाहण्या सारखे आहे, थांब पहि०-कांही तरि बोलते आहे आपली ! ही थांबते हो बाई. दुस-माझ्याच करतां थांबणार किनई अगदी. तुला नकोच असेल थांबायला मनापासून. ( बालक घेऊन आलेली स्त्री महाराजांच्या चरणावर बालक वाहते. पेढे वगैरे ठेवतात पाया पडतात.) म्हातारी-महाराज आपल्या कृपने हा मला नात झाला बरें! पायांवर आपल्या वाहिला आहे. आपल्या कृपेनें उदंड आउक्षाचा होवो. ह्या माझ्या सुनेलान् मुलाला जोडप्यानी पाया पडायला आणलेले आहेत. (त्यास पाया पडण्यास सांगते ते पाया पडतात.) महा-करता करविता नरहरि आहे, त्याचे चिंतन करित जा. यथास्थित होईल. दुस०-असं जोडप्याने यावं लागेल बरं पाया पडायला? हंसतेस काय? पुढल्या वर्षी ह्याच दिवसांत, मुलगें हे असेंच कडेवर. पहि०-आणि ह्या म्हातारीच्या ऐवजी तूं वाटतें कर थट्टा काही तरी. दस-अग, मी येईन बरें घाबरूं नकोस तूं. थट्टा कशाला? अगदी खरखरें असें होणार. नाही झाले तर ही जीभ कापन देईन जीभ. महाराजांनी सांगितलेच आहे तसें. (एक मुलगा प्रवेश करतो. पाया पडून नारळ पुढे ठेवतो.) मुलगा-महाराज माझी परिक्षा उतरावी एवढा हेतू धरून चरणापाशी आलो आहे. महा०-होईल बरें परिक्षा पास. श्रीशंकरावर एकादशणी रोज करित जा. कामना सिद्ध होतील. (एक गृहस्थ येऊन पाया पडून) गृहस्थ-महाराज चरणाच्या कृपेकरून नोकरी लागली. नवस