पान:देवमामलेदार.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. सुम०-असावा म्हणजे काय ? हा प्रत्यक्ष पहाच. (दाखवून ) हे पहा महाराज देवघरांत पुजेला बसले आहेत. गर्दी किती जमली आहे पहा त्यांच्या करतां लोकांची. तुम्ही या भिक्षूकमंडळींत बसा असे इकडे. इथून तुमच्या सारे दृष्टीस पडेल. ( स्वगत ) आमचा जीर्ण झालेला धर्मपुरुष, ह्या म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपाने तर आला नाही? (देखावा दिसतो, दोन बाया प्रवेश करतात.) दुसरी-(पहिलीस ) अग, पड महाराजांच्या पाया. ( महाराजांस ) बिचारी नवस करकरून दमली मुलाकरा! महराजांच्या चरणापाशी आली आहे आशिरवादा साठी. ( पायापडतात ) महा०-बाई, काही काळजी करू नका बरें ! श्रीनरहरी कृपा करील. पतिची सेवा करित जा, देवाचें रोज तीर्थ घेत जा. औदुंबराला सहस्र प्रदक्षणा घालित जा. कामना नरहरी पूर्ण करणार समर्थ आहे (नारळ देतात.) दुसरी-( महाराजांस ) मनासारखे झाले म्हणजे ती नवस फेडणार आहे महाराजांचा प्रयोजन घालून, आन् पेढे वाटणार आहे. ( पहिलीस ) आणखी काही विचारायचं आहे ? पहिली-( हळूच ) कायगं हे मेलें ? मुलां करतां का मी नवस करून दमले ? आपली महाराजांच्या पाया पडायला आले होते, काय तरी बाई तूं आहेस गं ? दुसरी-चुकले बाई मी. मग सांगूकां महाराजांना अजून, किं हीला मुलगा नको आहे, आपली एरवींच दर्शनाला आली होती. नवसाला तिने आपली उगीच मान डोलवलीन म्हणून ? पहि-तसें नाहींग. रागाऊं नकोस कांही. पण मेली आपली लाज नाही का वाटत मटलं ? बरे पण त्या गण्याला हाक मार इकडे. दुस-अग, हा जवळ तुझ्या उभा. इतकी भांबावलीस कशानगण्या गण्या-जी, काय बाईसाव? पहि. हा नारळ ठेव आन चला.