पान:देवमामलेदार.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. लास. मी मोठ्या फिकिरीत होतोरे बाळा. हा जीव सुद्धा द्यावा आणि सुटावें एकर्दा ह्या त्रासांतून, असे झाले होते मला. सुम०-मला वाटतें मुंबई तुम्ही उगीच सोडलीत ! तिथेच राहिले असतेत म्हणजे इतका आटाआट तुमच्या जीवाचा झाला नसता. म्हातान्तें खरें बाळा. पण त्या मंबईत राहण्याचा मस किळस येतो. आचारविचार जेथे सुटला, तेथें ब्राह्मणाने राहूं नये. बिघडलें बाबा सगळे. आतां कलियुग होणार जिकडे तिकडे. बाटे झाले सगळे लोक. बाह्मणांनी ताळ सोडला. त्या मुंबईत माझें काहींच जमत नसे अगदी सोवळ्या ओवळ्याचें. मनास तेथे होतो तों पर्यत शुद्धच वाटत नव्हते. उम्हासे येत. सुम०-चरोबरच. तुम्हाला शुद्ध हवेत गांवच्या गांवांत राह—ण्याची संवय, एकदम शहरची राहणी तुम्हांला कसली आवडणार ? तशांत तें मुंबई शहर म्हणजे बकाली. जुन्या पद्धतिच्या लोकाना तर ते मुळीच पसंत पडायचे नाही. ह्या पुण्यामध्ये तुम्हाला काही -बरें वाटेल. म्हाता०-अरे बाबा, पेशवे होते पेशवे या पुण्यात, तेव्हांची-हें असें चालेल ? फांशी दिले असते अशा ब्राह्मणांना ! संताप येतो यांच्याकडे पाहिले म्हणजे. धर्म बुडवायास निपजले आहेत. काय करावें राजा पडला म्लेंच्छ. देवा तूं तरी अवतार घेऊन धर्माचे रक्षण कर. सुम०- (स्वगत) म्हातारा धर्माचा अभिमानी कडक आहे. भूक बिक विसरून गेला रागाच्या आवेशात ! ( उघड ) धर्मावर मोठा प्रसंग गुदरला आहे खरा म्हातारे बुवा. पण ईश्वराला आहेच काळजी. तोच यशवंतराव महाराजांच्या रूपाने अशा प्रसंगी अवतरला आहे. म्हाता०-अरे भगवद्गीतेंत वचनच आहे भगवंताचें की “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ॥ अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ॥ " खरे सांगितलेस तूं. यशवंतराय महाराज हा अवतारिक पुरुषच असावा.