पान:देवमामलेदार.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. देवा कायरे हा प्रसंग आणलास? मी तरुण असतांना ज्याचे पोषण कलें, त्यांनी माझ्या लाथ मारून मस द्यावें हाकलून अँ ? लोकहो, सावध व्हा माझें उदाहरण पाहून. तुम्ही तरी असें या मायाजाळांत सांपडून फसं नका. कोणाचा कोणी नाही. ज्याचा तो; हे माझ्याकडे पाहून लक्ष्यांत घ्या. आणि माझी म्हाताऱ्याची कोणीतरी दया करा. ( पडद्यांत-"कोण विवळते तिकडे?') अँ, माझी कोणाला आली वाटतें दया ? बाबा, कोण ईश्वराचा लाल असशील, तो माझ्या जवळ ये. मी म्हातारा आहे; मस जरा कमी दिसते. ( सुमती प्रवेश करतो.) सुम०-(जवळ जाऊन) हा जवळ आलों, काय म्हणतां म्हातारेबोवा ? तुह्मी असे विवळतां का ? ह्या पुण्यांत यशवंतरावमहाराज आल्यापासून दुःख विवळणे, पार पळन गेले आहे. मातारा-बाबा, त्या महापुरुषाचें नांव मी ऐकले आहे. तो महाउदार आहे ह्मणून लोक सांगतात. पण मी हा आत्तांच पुण्यांत आलो. वीस बावीस दिवस झाले मुंबई सोडल्यास. तेव्हांपासून माझे हाल चालले आहेत रे मुला ! पोटांत कालपासून अन्न नाही. पुढे पाऊल कांहीं आतां टाकवत नाही. ही भिक्षा आहे, पण शिजवून घालणारा, कोणी पुण्यवान प्राणी पाहिजे ना? सुमती-तुम्ही मुंबईहून आलात तर ? मुंबई सोडण्याचे कारण? म्हातारा-बाबा, मी आलो तसा म्हणशील तर कोंकणांतून. कोकणांत माझें घर. मुंबइला माझे दोन मुलगे आहेत. पण ते नसते झाले तरी बरें होतें. काय तुला कर्मकथा सांगुं आपली ! (विवळत) माझे प्राण भुकेने व्याकूळ झालेले तुला दिसत नाहीतका बाळा ? सुम-(म्हाताऱ्याचा हात धरून) बरें चला तर. तुम्हांला आयते नेऊन पानावर बसवतों, मग तर झालें ? इथे यशवंतराव महाराज आल्याचे, तुम्हांला सांगितलेच. त्यांच्याकडे आज आहे प्रयोजन. त्यांची जन्मभूमी इथे माणकेश्वरांचा वाडा. तिचे दर्शन विधीपूर्वक महाराजांनी घेतले, आणि त्याची ही जेवणावळ. साता०-(चालत ) बरें बाबा. मस तूं एक देवदूतच भेट