पान:देवमामलेदार.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. गले मस? आतां. तरुण असताना यंव करीन नी त्यंव करीन, असें मिशाला पीळ घालून, मी लोकां जवळ बोलत असें. माझा मुलगा, माझी दौलत, माझी बायको, माझे घर, माझी शेते, माझी जमीन, माझी गुरे, माझी ढोरें, हे सगळे माझें असें मस वाटत असे. हे माझें नव्हे अशी शंका सुद्धा कधी आली नाही ! पण आतां मात्र हरलों ! आमचे कुटुंब वारले. आम्ही म्हातारे, असें पाहून, भावाने सगळे विष्टेंट हाताखाली घातले. घरांत आमचे हाल व्हायास लागले, मनांत विचार केला, आमचे वडले चिरंजिव धकटंभट मुंबईस आहेत; तर त्याजकडेस जावें,m, अशा बेताने मुंबईस आलों, तर आमच्या धकटंभटाने चांगले प्रकाश पाडले, मस म्हणतो गाढवाचा लेंक, की " तम्ही कोण आलात हो मोठे बायकोचे सासरे? तुमच्या सेवा करण्यासाठी, आम्ही बायकांशी लग्ने लावली नाहीत ! पत्करत असेल तर इथे उष्टी काढावी लागतील. आलाच आहा आतां, बोडकें टेकायास, तर आठ दिवस रहा आणि घरी चालते व्हा मग. तिकडे भावाशी जमत नाही, आतां इकडे आले त्रास द्यायास"! इतके त्या गाढवाच्या तोंडचे शब्द ऐकल्या वर, तसाच रागा रागाने निघालों तेथून आणि म्हटलें एकदां लिलीकडे जाऊन पहावें, तो अजून लहान आहे. याच्या सारखे त्याला अजून कान फुटले नाहीत. शिवाय हा भिक्षकडा आणि तो वकिल. असे मनांतले मांडे खात आमची स्वारी, तेथे जाऊन थडकली. पण तेथे गेल्यावर काय,पत्राच्या तोंडची उत्तरें ऐकून, आनंदाला बॉबच ठोकावी लागली. माझा लिली म्हणून मांडीवर हगण्याचें ज्याच्या मी कौतुक करावें, त्याच्याच तोंडची मुक्ताफळे ही ! परमेश्वरा, तुझ्या घरी न्याय नाहीरे ! मस रांडलेक धडधडित म्हणाला, मी तुला ओळखत नाहीं जा. तूं माझा बाप आहेस असें, गाझिट का काय गाढवीचा म्हणाला फाजिट तें, न्यांत छापलें आहे काय ? शिनळीचा मस म्हणतो, जा, कायदेशीर हो, कायदा शीक. या जगांत जिवंत राहिला आहेस कशास असा ? अर्थात ते नाहि आमची पिंड का निघाली. परत घरी जावें तर हीच रड. मग निघालों भीक मागत रघुवीराच्या नांवावर. (रडत)