पान:देवमामलेदार.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. फुल ०-(आपल्या थोबा डिंत मारून घेऊन ) चुकलो, चुकलो, माफकरा दादासाब. आपुन खरा खरा त्येच बोललो. पन ह्ये बघा, मला लई दोड ख्वाड हाय कमजास्त बोलण्याची. कंधों कंधों ह्ये त्वांड बधा कांबुत हातच नाय. माफ करा साब ( तोंडात मारून घेतो.) धनं०-अरे बाबा, मी तुझी थट्टा करित नाही. तूं जें बोललास तें वाईट बुद्धिनें मुळीच नव्हते, तुं म्हणालास फूले फार महाग झाली आहेत, तर ही तूंच केलेली त्याची वास्तविक किंमत घे, आणि संतुष्ट होऊन जा. (घावयास लागतो.) फुल-नग नग. दादासाब. मी संतुष्ट हाय पघा. त्येंची किंमत रुपाया खरी, पन तुम्हां सारख्या भल्या मानसापून मला इक्तीच पुरं. तुमच्या पायाच्यान मलाही ( पावली दाखवतो ) रुपायाच्या जागी हाय. मी जातो आतां. वाढूळ झाला, बागवान गागल कि ! (जातो) अरुण-पोरगे फार भित्रे, पण बरें आहे गमती हं ! जय०-बरें तें असो, फुलें वगैरे तर घेतलीच आहेत बायकांनी. धनं०-या रांगोळ्यांनी किती शोभा दिसते ! जयरवा, आपले आम्रपल्लव जितक्या खुबीने लागयला पाहिजेत, तितके लागले नाहीत. ते समोरच्या घराचे बघ अरुण-आणि त्या पलिकडल्या घराच्या खिडक्या, पहा कशा नाना त-हेच्या पल्लवांनी अलंकृत केल्या आहेत ? धनं-ते केळीचे खांब तरी किती मजेने उभे राहिले आहेत. जय०-त्यांच्या वरच्या केळफुलांनी त्यांना फारच शोभा आणली आहे. अरु०-असे पहात पहात चाललो तर धनं०-तर काय वेडे आहा, सगळीकडे-सगळ्या नगरानें आज शृंगार केला आहे, कुठपर्यंत तुम्ही भटकत राहणार ? हे शहर म्हणजे लहान सहान नाही. (आनंदाने ) ऐका, ऐका. हा पहा यशवंतराव महाराजकी जय' झाला. ती पहा उसळली गर्दी... जय०-( पाहून ) जसे काही एकादें बंडच उठले आहे. ( पुढे