पान:देवमामलेदार.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. रेव-काय मेला फाजिल आहेग हा फूलवाला ! रुक्मि-तुझ्या आपल्या मालाची किंमत बोल. आमी धरांत खर्च नाहितर पाहिजेल तें करूं. फुल०-मग बाईसाब रुपया पडल. सुमु०-चार आण्याला द्यायची आहेत कां ? गोपि-हो चार आण्याचा माल आहे. नाहीतर जा कसा आपली टोपली घेऊन ! फुल०-आन् फुल हत्तच ठेऊं ? बरा वयासाब न्याव हाय. गोपि०-अरे बाबा, असे अर्थाचे अनर्थ करूं नको. बारिक पोर आहेस पण फारच फाजिल आहेस. फुल०-बया साब, रागाऊं नगा. काढा किंमत, कां ह्यो चाललो बघा, हत उभाबी हात नाय, तुमास्नी तरास द्यायला मंग. रेव०-(चार आणे देते ) हे घे बावा. फल०-(जातांना) हे बघा बयासाब. फुलं झाल्याती लई म्हांग. तुमाला रुपया देउनशानबी इकती मिलाली नसती. पन् यशवंतराव म्हादेवाला समरून मी तुम्हांला दिली बगा. (धनंजय, अरुणप्रकाश, जयरव, व इतर येतात.) धनंजय-( फुलवाल्यास ) अरे ए फूलवाला ! फुल-कायव दादा, फुलं झाली, समदी उडाली. तुमास्नी काय फुलं अरुणप्रकाश-त्याचं बोलणं चालले होतें ऐकलेत का तुम्ही ? मोठा गमत्या आहे, त्याची थोडी गम्मत-( फुलवाल्यास) अरे जाऊ नको. इकडे ये. आणखी दुसरी फुलं घेऊन येतोस का ? जयरव-तुझा बाग जवळ आहे येथून का लांब ? फुल०-हाय जवलच. पन पघा फुलं आतां हायली नाहिती. आतां गांवामंदि दुसरीकडंबी मारामारच फुलांची. दुपारपुन चिभन धनं०-(बारा आणे पुढे करून ) ही घे तुझ्या मालाची खरी किंमत. ह्या बायांना तूं फुलें दिलीस ना ? त्यांना काय म्हणलास तूं : म्हणून