पान:देवमामलेदार.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. सुमुखी-अरे ही चवथी खेप म्हणून म्हणतोसना ? मग बोहणी कसली आतां? फुल०-तसं नव्ह, बयासाब. ह्या पाटीची व्हनार ही तुमच्याच हातची परथमची. रेवति- कसकसली फुलें आहेत, ती आम्हाला दाखव, गोपिका- निरनिराळी काढ्न बाहेर ? फुल०-( काढित ) ही बघा गुलावाची. ही जायीची. ही बघा मोगऱ्याची. देवाच्यान्, असलं मोगऱ्याचं फुल, तुम्हाला समद्या गांवामंदिवी मिळायचं नाय. ह्येची कलमं पघा मंबईशी हानलेली हायती. चिभन टप्पोरा फुल नव्हका ? महाराजांच्या गळ्यामंदि, माळ पन माळ शोभल. आपल्या मनामंदि लइ लइ येतया, पन इचारतो कोन आपनास्नी! (पाटी उचलून ) बोला बाईसाब वत समदी पाटी? सगळ्या-अरे पण त्याची किंमत सांगशिलना ? फुलवाला-त्येची काय किंमत, तुमी याल ती ! सुमुखी-असं कसं ? निट बोल बाबा ! रेवति-आपली किंमत सांग लवकर, आन् पैसे घे. फुल०-बयासाब. त्येची काय किंमत करताया ? त्ये काय खायाची वस्तु हाय? तुमी तरि महारांजाकरतांच घेनारना? तुमच्या घरामंदि थोडीच खरचनार तुम्ही ! चला काढा किंमत, तुमच्या मनाला वाटल ती ? रुक्मि -तर मग दोन पैसे घेशिल ? गोपि० रुक्मिणीबाई, बऱ्याच आहांत हो तुम्ही तरी ? सग०-तसं नको. त्याला आपले आठ पैसे द्या. मधुसात-हो, त्याच्या मालाची त्याला किंमत मिळाली पाहिजेना? फल०-बाई साब, दोन पैसे द्या, चार घा, सहा द्या, ज्ये तमच्या मनाला येतील त्ये था, म्हुन बोललो ना पहिले तुमाला ? पन ह्य पघा, घरामंदि खरचाचा नाय बरंका फूल ? नाहीतर घालाल येण्यामंदि गजरे करूनशान. त्ये नाय कामास पडायचा.