पान:देवमामलेदार.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ देवमामलेदार. (इतक्यांत मधुमात, गोपिका, रुक्मिणी, वैगरे स्त्रिया प्रवेश करतात.) रुक्मिणी-पाहिलीस गोपिके, मधुमति कशी ठुमकत ठुमकत चालली आहे ती. बरी दिसते हो पण. रुपाने चांगली आहे. गोपिका-रुक्मिणीबाई, आपण नव्हतों कां अशा चालत हिच्या वयाच्या होतो तेव्हां? मग तिलाच कां बरें हंसावें? रुक्मि-मी हंसते कां तिला ? पण आपलं तिला तें शोभतं अस मटलं हो. ( पाहून ) अगबाई, पाहिलंत कां गोपिकाबाई, अजून यांच्या रांगोळ्याच चालल्या आहेत. गोपि०-रेवती बाई, अहो रेवतीबाईअ-अगदी रांगोळ्यांत गर्कना? पाहुं कशा काढल्या आहेत आमच्या रेवतीबाईनी ? ( पहावयास जाते) रेव०-(तिच्या खांद्यावर हात टाकून ) ह्या पहा, आहे का कांहीं रंग रुप त्याला ? गोपि०-कशाला असेल ? ( हंसत ) मेलं रुप नाही आन् रंग नाहींना? सुम०-गोपिकाबाई, आपलं चांगलं असलं तरि कोणी आपले आपल्याच चांगलं ह्मणून घेतं का? (फुलमाळी "फुलें ध्या फुलें" असे ओरडतात.) सुम०-अरे ए फुलवाला ! मधुमती-इकडे येरे फुलवाला ! गोपिकारुक्मिणी-1 ( फुलमाळी येतो त्यास ) कसकसली फुलें रेवति- आहेत रे? फुलवाला-बाईसाब, समद्या परकाराचे हैत. गुलाब है, सोनचापा है. मोगरा है. दवणा हाय. मदनबाण हाय. चमेलीची फुलं हति. तुलसी, मरवा, आन् दुरवावी हैत नव्हंका या व्योपल्यामंदि ! आज बगा लई इक्रि. लई इक्रि. इक्स्याच फुलानं भरलेल्या अशा पाट्या, या डोस्क्यान् आज चार वकत वाहिल्या नव्हका : ही चौथी खेप बघा बयासाब. करा बव्हानी बघु यशवंतराव महाराजांच्या नांवानें!