पान:देवमामलेदार.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. कांहीं खोटं नाही. हे आलेच महाराज इकडे. बरोबर कलेक्टर वगरे साहेब मंडळी आहे. आपण असे बाजूला उभे राहूं. (तसे करतात. महाराज, कलेक्टर अस्किन, व लोक येतात ' यशवंतराव महारजकीजय ' होतो. पोलिस ‘बाजू बाज़' म्हणतात.) पहि०-चला. महाराज गावांत जाताहेत, आपण पुढे जाऊन सर्वांना महाराज आल्याची वर्दी देऊ. दुस-बहुतकरून ती लोकांना तेव्हांच लागली असावी. पण चला, गावांत जर ही बातमी लोकांस लागली असेल तर मोठी गम्मत उडाली असेल. पहि०-उडणारच. महाराजांवर भक्ति च लोकांची तशी आहे (चालू लागतात.) दुस-कशी आहे ती प्रत्यक्ष पहाच ही. ह्या स्त्रिया पाण्याने भरलेले कलश घेऊन किती जलदीने घराकडे चालल्या आहेत ! त्यांच्या भाषणांत महाराजांशिवाय विषय नाही. पहि०-इथे आपल्याला घटकाभर करमणूक होणार ! उभा रहा. हे स्त्रीपुरुष महाराजांचे स्वागत करण्यांत किती गुंग झाले आहेत ते पहा ! पण नको. चलच, आपणहि अशीच कांहीं तरि महाराजांची सेवा करू. (जातात.) ( पडदा उघडतो सुमती, रेवती आणि सुमुखी दृष्टीस पडतात.) सुमुखी०-अग बाई, झाल्या का रांगोळ्या काढून सुमती बाई? रेवती-त्या काय बाई, ज्या त्या कामांत सुग्रण आहेत ! त्यांचा हात कोण धरिल ? पहा किती रांगोळ्या जलद काढून पुन्हां कशा चांगल्या काढल्या आहेत त्या ! सुम०-ही पाहिलीत कां रेवती बाई, मी एक आपली काढून पाहते आहे. मला मेली बरी नाही वाटतं! रेव०-(पाहत ) अगबाई, हिला वाईट कोण ह्मणेल? ही नका हो पसं तुम्ही. वाईट बिईट ह्मणून पुसाल एकाद्या ! मला कांहीं बाई तुमच्या दोघींसारख्या नाहीं साधायच्या. कशा तरी घालते आपल्या. रांगोळी नासते झालं ! ( काढू लागते.)