पान:देवमामलेदार.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. अकिन-आपण म्हणटां, टे बड्डुल माझी आटा खाट्री झाली. आपला इंडिया फिलाजफीचा माहेरघर. युरोपमंडी या विज्येचा इतका उडय झालेला नाय. जया०- (घड्याळ पाहून.) बरें आहे, घेतों रजा मी आपली. (महाराजांच्या पायावर डोके ठेवतात. आस्किन कलेक्टर टोपी काढतो व जयाजीराव महाराजांस नोटी देण्यास पुढे करतात.) महा०-हें काय बोलतां आपण ? आतांच इतकी घाई करण्याचे कारण नाही. तितकीच गरज लागेल, तेव्हां मी आपल्याकडून मागून घेईन. (जयाजीराव गाडीकडे जातात. त्यांच्या बरोबर सर्व जातात.) आस्किन-( जातांना ) कशला गलबा हा ! शिपाई-(प्रवेशकरून ) रावसाहेब मामलेदारांच्या दर्शनाकरतां लोक जमले आहेत साहेब. ( जातात) (दोन गृहस्थ एकाबाजूने बोलत येतात.) पहिला-देण्याची म्हणजे त्या पुरुषाला जशी कांहीं उकळीच येते. कोणी मागण्याचा अवकाश, किं या महात्म्या पासून तो विन्मुख गेला असें व्हायचंच नाही. दुसरा-म्हणूनच लोकाचें महाराजांवर प्रेम आहे. जसें द्या तसे व्याव हा न्याय अगदी खरा आहे. 'प्रिती पासनी प्रिती वाढती ही अक्षरं जर प्रत्येक मनुष्याने, आपल्या हृत्पटलावर खोदून ठेवून त्या प्रमाणे वर्तन ठेवलें, तर हा जगाचा गाडा किती सुरळीत चालेल बर. तशा प्रकारे वागणारा हा एकच महात्मा उत्पन्न झाला आहे, तर कृतयुगाचा भास व्हावयास लागला मग सर्वांनीच असा विचार केला तर किती सुख होईल बरें? मला वाटतें स्वगीत राहणारे देव सुद्धा आम्हां मानवांचा अशाने हेवा करूं लागतील. पहि०-यांत काय संशय ? हल्ली आम्हांला जे सख आहे तें दवाना खचित नाही. अरे पण तिकडे पहा, महाराजांना त्या अधिळ्याची दिन स्थिती पाहून गहिवर आला. ते पहा स्वतःचे अश्रु पुशित त्यास कांहीं देत आहेत ! किती कनवाळू स्वभाव ! दुस-" परदुःखेन दुःखिता विरला " असे म्हणतात तें