पान:देवमामलेदार.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३रा. ४९ जया०-तो गुण त्यांच्यात उपजतच असला पाहिजे असे वाटते. दातृत्वाच्या सहचर्याने राहणारे दुसरेहि पुष्कळ गुण त्यांच्यात आहेत. अस्किन-कांही लोक डाटे असटाट, पण टे, ज्याना कांहीं डेटाट, टे टेना कड लागेल अशा बोलू डेटे. तशा वाईट गुण येच्या शांट मुंद्रेवरून अगडी कळून येट नाय. बटा महाटमा पुरुष हाय. जया-दुसऱ्यांची दया हेच त्यांचे भांडवल आहे. अर्रिकन-अशा टो खरा. पन मला वाटतो, डान कराच्या, किंवा काही डेयाच्या टो लायखीच्या माणूस पाहून डिलेला चांगला. अप्पाराव-(नोटी पुढे करून, महाराजांस हलकेंच ) महाराज, आपल्याला सरकारांनी या अर्पण करायला सांगितल्या आहेत मला. तर कृपा करून यांचा स्विकार करावा. महाराज-(किंचित हंसत ) छे छे छे. कृपा करून सध्या तें तसेंच ठेऊन द्या. जया०-लायकीचा मनुष्य पाहून देणे,हें पूर्ण सुधारलेल्या बुद्धिचें लक्षण समजता किं काय आपण ? तो नंबर याच्या खाली लागणार ! अस्किन-टो मला कबूल हाय. पण निडान राजशट्टेला, म्हणजे राजशट्टा ज्यांच्या हाटांट थोडी बहुट राहटे, अशे लोकांना टे चांगला नाय, अशा माझा बोलना. जया ०-( हंसत ) असे पहिल्याने कोणालाहि वाटतें खरें किं सगळेच मामलेदार किंवा सगळेच कलेक्टर जर असे दाते झाले, तर सर्वत्र बजबजपुरी माजेल, परंतु ही भूल आहे. कारण लोकांच्या गरजा भागल्या, म्हणजे तेच संतुष्ट होऊन, त्याचा कसा चांगला मोबदला देतात, याचा प्रत्यक्ष अनुभव या साधुवांनी आणून दिला आहे. असेच जर सर्व अधिकारी होतील, तर धर्मराज्य, किंवा रामराज्याचा अनुभव, या कलियुगांत लोकांना येईल! गुन्हें हल्ली होतात ते आपोआप बंद होतील. आपसांतली भांडणे मिटतील. ऋणकोस धनको सूट चावयास लागला, तर ऋणको ती आपल्यास नको, म्हणून त्याच्याशी भांडण्यास उठला, अशी उलटी भांडणे आपणास पाहायला सांपडतील ! तेव्हां अशा वृत्तीने तोटा मुळीच नसून सर्वतोपरि नफाच आहे.