पान:देवमामलेदार.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ देवमामलेदार. आणि टुमच्या शंगटी आमाला पण व्येचा लाभ होटो. ये बद्दल आमी डेवाचे मोठे आभारी हाय.' महा०-कशाची कशाची फळे ? मी एक यःकश्चित माणूस ! जया०-आमच्या लार्भात तुम्हांसहि वाटा मिळतो, या गोष्टि बद्दल कोणालाहि वाईट वाटणार नाही. या कसलेल्या आर्यभामपासून उत्पन्न होणाऱ्या फळाची आमचे दोस्त सरकार इच्छा करतात, आणि त्या आर्यभूमिच्या लेकरांस ज्ञानामृत पाजण्यासाठी विद्यालये स्थापन करण्याचीहि इच्छा करतात, हे त्यांस भषण आहे. ह्या शिक्षणापासून हिंदुस्तानचे कल्याण होवो, आणि आमचा व आमच्या दोस्त सरकारचा सलोखा अव्याहत चालो हीच आमची इच्छा आहे. अस्कि-आपण इंडियन संस्थानिक, म्हणजे हिंदुस्थानचे युढारी, ढर्म, जात, आच्यार, विच्यार, आपला, ट्येचा येक. आपल्या पुर्वज्यांनी मागें एकवेळ पुढारीपण पटकरून, या देशाला, मोंगल लोकां पासून स्वटंब केला; तेव्हां अपनाला टेचा, आभमान राहना, स्वाभाविक हाय. आटां इंग्लिश लोक, ऍन्ड मोंगल या मांड किटी अंटर हाय, ये टमी जानटाच. इंग्लिश लोक डोस्ट सरकारांचा मान कशा राखतात आणि आपले प्रजेचे हक कशे शांभाळतात, हे आपनाला पुढारी लोकांला माहिटी हाय. आणि हिंदुस्ठानचे पुढारी, अशा महात्म्यांच्या सल्याने आपल्या ढर्माची सुधारणा करतात, ये टेना मोठा भुषण हाय. जया०-धर्माच्या सुधारणे साठी, यांचा अवतार आहे. बहुतकरून राजा बदलला किं मनू बदलतो. आमच्या दोस्त सरकारांनी, जी ही क्रांती घडवून आणली, तिच्यामुळे लोकांची मने धर्माविषयों, बरीच गढूळ झाली होती. ती ह्यांच्या सहवासाने, निवळत आहेत, हे या देशाचे महत्भाग्य समजले पाहिजे. (घड्याळ काढून किती वाजले ते पाहतात, व 'अप्पाराव' असे म्हणतात, त्यांस । महाराजास देण्या विषयी खुणवतात.) अर्सिक-मला वाटतो, येच्याट डाटूत्व गुण अमोल हाय.