पान:देवमामलेदार.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ अंक ३ रा. सिंधिया. मेरा हात ये शेकह्यांडमें सुरक्षित रहा, परमेसरकी खैर हुवी. ( उघड ) टुमची भेट झाली आम्हांला बहुट आनंड वाटतो. टुमी बाँबेशी येनार, टेची आमाला खबर पोचटाच, आमी इकडे निघून आलो. टुमचे सारखे इंडियन संस्थानिक पाहणेची, आमचे आंग्रेज लोकांना बहुट इच्छा. टुमचा परिचय घडावा, टमचा शमागम घडावा, टुमचा चाली रीटी आमच्या लोकांना माहित पडाव्या येच्या आमच्या लोकांना नाड हाय. ये हिंडूस्ठान डेश प्राचिन काळ पासून, सिव्हिलाईज्ड, आय से सुधारलेला हाय. टे करटां आमाला टेचा मोठा कौटुक वाटटो. आमाला टुमची लंग्वेज, आय से भाषाबी बोलाला चांगली लागटो. जया-आपणासारखे इंग्रज अधिकारी, मुद्दाम येऊन आम्हांला भेटतात, या बद्दल मला आनंद वाटतो. व मी या बद्दल आपले आभारहि मानतो. आता आपण आमच्या देशाची स्तुति केलीत. हे ठिकच केलेत आपण. परंतु हा गत वैभव देश, आतां इतक्या स्तुतिला पात्र आहे, असे मला वाटत नाही. सिंहाच्या दरीत कोल्ह्यांनी भोकावे, यांत कांही या देशाला मोठेसें भूषण नाही. परंतु समाधानाची गोष्ट ही आहे किं, आमचे दोस्त इंग्रज सरकार, हे सर्व जगांत अत्यंत सुधारलेले असल्यामुळे, त्यांच्या अमलाखाली आमच्या देशाला करून घेतले तर बहुमोल असे लाभ होणार आहेत. आणि इंडियन संस्थानिक जर त्यांना चाहत असतील, तर त्यांच्या ह्या गुणांमुळेच. आम्हांला पेशव्यांचा अम्मल म्हणजे, दुःसह वाटत होता, असें कांही नाही. परंतु जी सुधारणा आज आमच्या दोस्त सरकारच्या, जातिंत आहे, ती आमच्यात नाही, आणि ह्याच कारणामुळे आम्हांला ही सांप्रतची स्थिती प्राप्त झाली. अस्किन-आमी आंग्रेज लोक आलिकडे सुधारले. आणि टुमी आर्य, प्राचिन सुधारलेले; अशा माझा बोलना. ये टुमचा आर्यभूमी असा कशलेला हाय कि दुष्काला मंडिभी टिच्यामंडी पिक चांगला यायचा. त्याची मशागत चांगली झाली असले शिवाय, टुमाला अशा चांगला फळा लाभटो ? ( महाराजांकडे बोट दाखवतो)