पान:देवमामलेदार.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. प्रवेश ५ वा. (स्थळ-शिंदे सरकारचा बंगला. महाराज असनावर बसले आहेत. शिंदे सरकार पाया पडत आहेत. नंतर दुसरे पडतात. राज स्त्रिया पाया पडतात. नंतर जोरावरसिंग साथ करित असतां नथ्थेखांचें गाणे सुरु होते. जयाजरािव-आज नथ्येखाने, महाराजकी सेवा अच्छि कियी, और आपने गुण बतानेकि शिकस्त कियी' असें बोलतात. पानसुपारी, अत्तर गुलाब, स्वस्तः शिंदे सरकार, महाराजांना देतात. व " आपल्या दर्शनाचा मला चार दिवस लाभ दिलात येणे करून, मी धन्य झालों" असे शिंदे बोलतात. महाराज " मी यः कश्चित मनुष्य, माझ्या दर्शनाचा लाभ तो कसला? आपण मला महत्व देऊन धन्यता मानून घेता,यति धन्यता मानण्यासारखे काही नाही. करता करवितां सर्व नरहरि आहे. मनुष्याने कोणताच गर्व वाहूं नये या सारखी धन्यतां कोणतीच नाही” असें बोलतात. मसाल्याचें दूघ सर्वास वाटल्यावर पडदा पडतो). अंक दुसरा समाप्त. अंक ३ रा. प्रवेश १ ला. ( स्थळ-नाशिक वेटिंगरुम. पात्रे-जयाजिरावशिंदे, अस्किन साहेब, व यशवंतराव महाराज.) महा०-हिंदुस्तानातील एका मोठ्या संस्थानाधिपतिची, आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत माझ्या हस्ताने घडावी, इतकी माझी योग्यता नाही. तर परमेश्वरी योगायोगामुळे, ज्याअर्थी हे काम आज मजकडे आले आहे, त्या अर्थी मी ते मोठ्या आनंदाने करतो. ( अस्किन आणि शिंदे शेक ह्यांड करतात.) अस्किन-( हात परत घेऊन स्वगत.) बडा जवामर्द है ये