पान:देवमामलेदार.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. राणी-तरी पण आग्रह केल्या शिवाय राहूं नये. इथं त्यांना राहायला जागा दिलेली आहे, ती तार चांगली आहेना ? जया०-हे कायग? खाशी पाहून दिलेली आहे जागा आपल्या आप्पारावनी! त्यांच्याकडे हे काम मुद्दाम दिले होते. कारण, हवा. शीर जागेचे ते शोकी. त्यांना साधी जागा पसंत पडायची नाही! राणी-महाराजांना नेमणूक करून द्यायची होती माझ्या मनांतून. जया०-( हंसन) वेडि नाहींस का तं अगदी ! महाराज कांहीं. तरि कारण सांगन नाकारतात. त्यांना म्हटले तुमच्या कर्जाची याद द्या. फेड करतो. तर म्हणाले " सावकाराचा मला तगादा नाही. तितकाच वेळ आली तर आपणाकडून मी मागून घेईन." ते कशाची नेमणूक घेतात ? अग, आले हेच भाग्य समज आपलें. मुंबई सरकारास सांगून, स्यांच्या जिल्हयाच्या कलेक्टरास तार केली, म्हणून त्यांनी त्यांना रजा देऊन, इकडे ताबडतोब पाठवलें. राणी-पण काहीसा हा जोराच नाही का झाला यांच्यावर? जया ०-खरें विचारशिल, तर तेंच आता माझ्या अंतःकरणाला खात आहे. पण आता मागून पश्चात्ताप होऊन काय उपयोग? खरेंच, आपण जरि त्यांच्या गांवी गेलो असतो, तरि बरें होतें. झाले ते काही येत नाही आता. ते महाराज समर्थ आहेत क्षमा करायला आपल्या दासाला! राणी-पंढरिला आल्याचे सार्थक झालें! जया०-अग हाच पंढरिनाथ प्रत्यक्ष मला भासतो. राणी-ज्याच्या करता एवढी यात्रा लोटते, तो कसा पंढरिनाथ नव्हे. ( ऐकलेसें करून ) जिन्यावर पावले कोणाची वाजली ? आप्पाराव आले वाटते? मी जाते. जया०-जा तू आतां. मी जाऊन महाराजाना घेऊन येतो. महाराज आल्याची तो वर्दी द्यावयास आला असेल. शेवटी तुला आजचा महोल कसा काय शृंगारला आहे, तें विचारण्याचे राहिलेच ! ( जातात.) चवथा प्रवेश समाप्त.