पान:देवमामलेदार.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. घेतले नाही, म्हणून आजचे न घेऊन तसे चालणार नाही. हे त्याच्या बायकोला मी लुगडे चोळी काढून ठेवलं आहे. हे त्यानां नाही म्हणता यायचं नाही. जया०-तूं म्हण काही. पण मला नाही वाटत. खरी निरीच्छ म्हणतात तीच वृत्ति आहे. धन्य त्यांची! सर्व राज्य ओवाळन, टाकावेसे वाटते अशा निरिच्छ पुरुषा वरून ! इतकं कर्ज आहे, पण तितकाच धीर आहे. राणी-मला बाई खरच पुसाल तर नवल वाटते, कर्जाकरतां तरि त्यांनी नाकारायचे नव्हते. लोकांचे विंचवडे काढून टाकायला हवें होते यांनी ! सावकाराच्या गळ्याला फांस, नी आपल्य गळ्याला फास ! जया०-अगे, हे पाहणे आपल्या कोत्या दृष्टिच्या माणसांचे. हे अमक्याचे, तें तमक्याचे, हा भेदाभेद त्या दृष्टिला नाहीच. जगतांतील सर्व संपत्ति त्या जगस्कुटुंबी महाराजांची आहे. आणि जगातले सर्व लोक, हे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंबातला मुख्य पुरुष, जसे सर्वांची मिळकत एकत्र करून, कुटुंब चालवतो, तसेंच हे आहे. आणि इतका त्यांचा अधिकार आहे, म्हणूनच खुशिनें सावकार लोक त्यांना कर्ज देतात. आणि ते मिळाले नाहीं तरि फिकीर करित नाहीत. उलट त्याचा चांगल्या कामांत व्यय झाला म्हणून आनंद मानतात! राणी-खरेंच बाई मला इतके दिवस मोठा गर्व होता, तो नाहीसा झाला. आपल्या राज्याची कथा काय, असल्या साधु पुरुषां पुढे ? जया-अग, अशा साधु पुरुषाच्या दर्शनाला जाण्याचा हेतु हाच. मनुष्याचा गर्वज्वर नाहीसा व्हावा, पहा बरें आज या एका महापुरषाच्या वृत्तीनें, कितीकांच्या या देशांत वृत्त्या पालटल्या आहेत त्या ! एका कुटुंबांतली आपण सर्व आहोत, अशी थोडिशी तरि कल्पना प्रत्येकाला होत असेल ! यांत संशय नाही. महाराजांस नहमीं ग्वालेरित ठेऊन घ्यावे, असे माझ्या मनात आहे. पण आता पर्यंतच्या एकंदर त्यांच्या स्वभावावरून, ते येतिलसें वाटत नाही.