पान:देवमामलेदार.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. जया०-शाबास. तूं एक पंडिताच आहेस! मला आडवलेंस खरें बुवा ! महाशक्ति म्हटले ते काय खोटें ? (हंसत) बरें मला राम ठरवलेंस, तूं सीता झालीस. महाराज कोण मग भगवान् वसिष्ट ? हो, आदिशक्ती नाचबिल तसें नाचले पाहिजे या रंगभुमीवर. (हनुवटीस हात लावून तिच्याकडे पहात हंसतो.) राणी-( हंसत ) हे काय बाई ! प्रेमाच्या भरात आले म्हणजे पुरुष काय करतील याचा बाई नेम नाही. मायेच्या पाशांत काही खोटे नाहीत हो. (आपल्या हातांनी त्याच्या गळयास मिठी मारते) जया०-( तबकांतला गजरा उचलून.) हा ह्या खोप्यावर किती रमणीय दिसेल बरें ? (ठेऊ लागतो.) राणी-(न ठेऊ देऊन ) अगबाई, हे काय ? ते त्या तबकांतले गजरे किनई मी आपल्या हातांनी मुद्दाम आज महाराजां करर्ता तयार करून ठेवले आहेत. तो ठेवावा गडे ! जया०-असें कां ? हे आम्हाला माहित नव्हते. हा ठेवला. (ठेवतो.) महाराजांवर एकंदरीत तुझी भक्ती खरी हं. किती सुबक आहे हा. उगिच स्तुति करित नाही, खरोखरच सांगतो, इतकी कुशलता माझ्या पाहण्यांत नाही. केव्हां आणि कुठे शिकलीस ही कला तूं ? बायका कुणाला दाद द्यायच्या नाहीत ! राणी-लहानपणी शिकले होते आपली थोडीशी. प्रसंग नाही कधी करायचा आजवर, कशाने कळणार इकडे ? आज आपलें सहज मनांत आलें सकाळी, म्हटले करून पहावा एकदा गजरा साधलातर, महाराजा करतां ! जया०-तुझी महाराजां वरची भक्ति पाहून मला फार संतोष होतो ! (दाखवून) तें पलिकडलें तबक तूंच ठेवले आहेस का ? तें लुगडे, चोळी, आणखी काय दागिने आहेत वाटतें आंत ? ठेवलेंस खरें, पण कालच्या सारखीच त्याची गत होणार आहे. तो निरिच्छ पुरुष त्यांतल्या एका तनसडिला शिवणार नाही. मग काय उपयोग? बाकी मी नाही म्हणत नाही तुझी इच्छा असलीतर ! राणी-कालच्या रुपयांच्या थैल्या, आणि दागिन्यांचे ताट,